शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

माजी महापौरांसाठी उघडले बालेकिल्ल्याचे द्वार

By admin | Updated: January 15, 2017 05:05 IST

पाच वर्षे बांधलेल्या प्रभागाचे फेररचनेत तुकडे झाल्याचा फटका निम्म्याहून अधिक नगरसेवकांना बसला आहे. मतदार विखुरले गेल्याने निवडून येण्याची शाश्वतीही अनेकांना नाही.

मुंबई : पाच वर्षे बांधलेल्या प्रभागाचे फेररचनेत तुकडे झाल्याचा फटका निम्म्याहून अधिक नगरसेवकांना बसला आहे. मतदार विखुरले गेल्याने निवडून येण्याची शाश्वतीही अनेकांना नाही. यामुळे बऱ्याच जणांनी पक्षातील आपले राजकीय वजन वापरून आपली जागा सेफ करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. जिथे अनेकांसाठी दरवाजे बंद झाले तेथे काहींसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांचा पुन्हा त्यांच्या बालेकिल्ल्यात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे स्वगृही परतण्यासाठी त्यांनीही जोरदार प्रयत्न सुरू केले असल्याचे सूत्रांकडून समजते.परळ येथील भोईवाडा प्रभागातून शिवसेनेच्या तिकिटावर श्रद्धा जाधव १९९२ मध्ये पहिल्यांदा निवडून आल्या. त्यानंतर पुढील सलग दोन पालिका निवडणुकांमध्ये जाधव या प्रभागातून निवडून आल्या. परंतु २००७ मध्ये त्यांच्या प्रभागात बदल होऊन एफ/उत्तर मधील अ‍ॅण्टॉप हिल, परळ येथून त्यांना निवडणूक लढवावी लागली. २००९ मध्ये त्यांना मुंबईच्या महापौरपदाचाही बहुमान मिळाला. २०१२ मध्येही पुन्हा त्यांना याच प्रभागातून निवडणूक लढवावी लागली. मात्र स्वगृही परतण्याची त्यांची ओढ कायम होती. २०१७ च्या निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या आरक्षणात त्यांना ही संधी चालून आली आहे.परळ, भोईवाडा हा त्यांचा जुना प्रभाग आता महिलांसाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे आपल्या हक्काच्या प्रभागात जाण्यास त्या आता इच्छुक आहेत. तशी इच्छाही त्यांनी पक्षाकडे व्यक्त केली आहे. सध्या या प्रभागात शिवसेनेचे नंदकिशोर विचारे नगरसेवक आहेत. मात्र या प्रभागातून निवडून येण्याची श्रद्धा जाधव यांना खात्री आहे. त्यामुळे आपल्या जुन्या प्रभागातून निवडणूक लढवू दिल्यास त्यांच्या विद्यमान प्रभागात उभ्या राहणाऱ्या शिवसेना पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्याची हमी त्यांनी पक्षाला दिली आहे, असे पक्षातील विश्वसनीय सूत्रांकडून समजते. (प्रतिनिधी)जुना प्रभाग आरक्षितपरळ, भोईवाडा हा त्यांचा जुना प्रभाग आता महिलांसाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे आपल्या हक्काच्या प्रभागात जाण्यास त्या आता इच्छुक आहेत. तशी इच्छाही त्यांनी पक्षाकडे व्यक्त केली असल्याचे सांगण्यात येते.