शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा भय्याजी जोशी की दत्तात्रय होसबळे?

By admin | Updated: February 18, 2015 02:15 IST

सरकार्यवाह पदासाठी भय्याजी जोशी यांनाच परत संधी मिळणार असल्याची चर्चा असली तरी सहसरकार्यवाह असलेल्या दत्तात्रय होसबळे यांच्या नावाचादेखील विचार होण्याची शक्यता आहे.

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सरकार्यवाह पदासाठी भय्याजी जोशी यांनाच परत संधी मिळणार असल्याची चर्चा असली तरी सहसरकार्यवाह असलेल्या दत्तात्रय होसबळे यांच्या नावाचादेखील विचार होण्याची शक्यता आहे. संघाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मार्चमध्ये नागपूर येथे होणाऱ्या संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत याबाबत निर्णय होणार आहे. लोकसभा निवडणुकीत संघाच्या प्रयत्नांना मिळालेल्या यशानंतर होणाऱ्या या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. संघात दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका होतात. महानगर संघचालकांच्या निवड प्रक्रियेनंतर आता सर्वांचे लक्ष या प्रतिनिधी सभेकडे लागले आहे. देशभरातून निवडण्यात आलेले अखिल भारतीय प्रतिनिधी या निवड प्रक्रियेत सहभागी होतील. या सभेत रिक्त जागादेखील भरण्यात येतील, तसेच संघटनविषयक बाबींसह सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जाणार अससल्याचे समजते़सरकार्यवाह पदासाठी २०१२ मध्ये होसबळे यांचे नाव समोर आले होते. परंतु भय्याजी जोशी यांची फेरनिवड करण्यात आली होती.गेल्या तीन वर्षांत होसबळे यांनी संघाच्या प्रसारात अन् निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका आणि लोकसभा निवडणुकीत मोठी जबाबदारी पार पाडली होती. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रमुखपद, सह बौद्धिक प्रमुख या जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या सांभाळल्या आहेत. (प्रतिनिधी)तरुण चेहऱ्याला संधी?राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा चेहरा तरुण करण्याच्या हालचाली सुुरू झाल्या आहेत. याच अनुषंगाने संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या जागेवर दत्तात्रय होसबळे यांची निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भय्याजी जोशी हे सत्तरीजवळ पोहोचले आहेत. होसबळे हे तुलनेने तरुण आहेत; शिवाय ते पंतप्रधान मोदी यांचे निकटवर्तीय मानले जातात.