शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

श्रींच्या स्थापनेसाठी भटजींची शोधाशोध

By admin | Updated: September 5, 2016 02:35 IST

लाडक्या गणरायाचे आगमन काही तासांवर येवून ठेपले आहे.

कमलाकर कांबळे,

नवी मुंबई- लाडक्या गणरायाचे आगमन काही तासांवर येवून ठेपले आहे. बाप्पांच्या स्वागतासाठी नवी मुंबईकर सज्ज झाले आहेत. घरोघरी श्रीमूर्तींच्या स्थापनेसाठी लगबग सुरू झाली आहे. जय्यत तयारी झाली असली तरी भटजींचे बुकिंग हाऊसफूल्ल झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात ३९७ सार्वजनिक व २८,५८१ घरगुती गणपती आहेत. स्थानिक आगरी-कोळ्यांचे गणपती हे आराध्य दैवत आहे. त्यामुळे प्रत्येक घरात भटजींच्या हस्ते विधिवत पूजा करून गणरायाची स्थापना केली जाते. त्यामुळे गणेश चतुर्थीला भटजींना चांगलीच मागणी असते. मागणीपेक्षा शहरात भटजींची संख्या कमी असल्याने दरवर्षी गणेशभक्तांना भटजींसाठी शोधाशोध करावी लागते. गणेशभक्तांची ही गैरसोय दूर करण्यासाठी काही प्रस्थापित भटजी मंडळींनी पूजेसाठी बाहेरगावांतून भटजींची कुमक मागविली आहे. यावर्षी जवळपास एक हजार भटजी गणेशोत्सवासाठी शहरात दाखल झाले आहेत. यात नाशिक, सोलापूर, कोल्हापूर , सातारा, धुळे, जळगांव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांतील भटजींचा समावेश आहे.नवी मुंबईत अनेक मंदिरे आहेत. गणेशपूजेसाठी मंदिरांतील भटजींकडे बुकिंग केले जाते. एका मंदिरात पूजेसाठी कमीत कमी २0 व जास्तीत जास्त ५00 जणांचे बुकिंग होते. श्रींच्या स्थापनेपासून विसर्जनापर्यंतच्या सर्व विधींचा यात समावेश असतो. पूजेची आॅर्डर पूर्ण करण्यासाठी बाहेर गावांतील भटजींचा आधार घेतला जातो. वाशी गाव येथील जागृतेश्वर मंदिरात यंदा गणरायाच्या स्थापनेसाठी रविवारी संध्याकाळपर्यंत तब्बल ७00 जणांनी भटजींची बुकिंग केली आहे. त्यासाठी अन्य जिल्ह्यांतून ३५ भटजींना बोलावले आहे. गणेशोत्सव होईपर्यंत त्यांचा निवास व जेवणाची सोय करण्यात आली आहे. शहरात अनेकदा भटजी नसला तरी पारंपरिक पध्दतीने श्रींच्या मूर्तीची स्थापना केली जाते, परंतु गावांत पूजेसाठी भटजी लागतोच. त्यासाठी अन्य जिल्ह्यातील भटजींना पाचारण करावे लागते. यावर्षी वाशी ते कोपरखैरणे या विभागात इतर जिल्ह्यांतून जवळपास अडीचशे भटजी गणेशोत्सवासाठी दाखल झाले आहेत. तर ऐरोली ते बेलापूर या पट्ट्यात बाहेरून आलेल्या या भटजींची संख्या एक हजाराच्या घरात आहे, अशी माहिती वाशी गाव येथील जागृतेश्वर मंदिरातील पुजारी नीलेश गुरूजी यांनी दिली. दहा दिवसांत १५ हजारांची कमाई पूजेच्या आॅर्डरनुसार भटजींना पाचारण केले जाते. त्यानुसार बाहेरगावातून आलेल्या एका भटजीला साधारण पंधरा गणपतींची आॅर्डर दिली जाते. एका पूजेसाठी ७५0 रूपयांची दक्षिणा मिळते. शिवाय सत्यनारायणाची पूजा असल्यास त्याची वेगळी दक्षिणा दिली जाते. अशाप्रकारे बाहेरगावातून आलेला एक भटजी गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत १0 ते १५ हजार रूपयांची कमाई करतो.