शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

बेटा दत्तू, देशासाठी पदक पटकावूनच आण....

By admin | Updated: July 29, 2016 22:21 IST

स्मृतिभंशामुळे सुमारे तीन महिन्यांपासून अंथरूणावर खिळलेली आई... वडील नसल्याने आईचाच काय तो एकमेव आधार... अशातही आई ओळखत नसल्याची आॅलिम्पिकपटू मुलाला असलेली खंत

राकेश जोशी, नाशिकस्मृतिभंशामुळे सुमारे तीन महिन्यांपासून अंथरूणावर खिळलेली आई... वडील नसल्याने आईचाच काय तो एकमेव आधार... अशातही आई ओळखत नसल्याची आॅलिम्पिकपटू मुलाला असलेली खंत... अन् चमत्कार घडावा त्याप्रमाणे आईने आॅलिम्पिक स्पर्धेतून पदक पटकाविण्यासाठी भरभरून दिलेला आशिर्वाद असा दुर्मीळ अन् तितकाच हृदयद्रावक प्रसंग शुक्रवारी घडला. ही कहाणी आहे, रिओ आॅलिम्पिक स्पर्धेतील रोर्इंग अर्थात नौकानयन स्पर्धेसाठी पात्र ठरलेला नाशिक जिल्ह्यातील तळेगाव रोहीचा जवान दत्तू भोकनळ आणि त्याच्या आईची.

त्याचे झाले असे, साधारण तीन महिन्यांपूर्वी दत्तू कोरिया येथे फिसा अशिया अ‍ॅण्ड ओशियाना कॉण्टिनेण्टल आॅलिम्पिक क्वॉलिफिकेशन स्पर्धेसाठी रवाना झाला. त्यावेळी त्याची आई आशाबाई ऊर्फ अक्का या घरात पाय घसरून पडल्याने झालेल्या अपघातात जखमी झाल्या. अपघात वरवर किरकोळ वाटत असला तरी त्यात त्यांना मेंदूला मार लागल्याने त्यांचा स्मृतिभंश झाला. त्या परिचितांना ओळखूही शकत नव्हत्या, अशी त्यांची स्थिती झाली होती. त्यांना तातडीने लष्कराच्या पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रिओ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरल्याच्या आनंदात दत्तू जेव्हा आईला पेढा भरविण्यासाठी घरी पोहोचला तेव्हासुद्धा दुर्दैव आड आले. दत्तूला आईने ओळखलेच नाही. दरम्यानच्या काळात उपचार सुरूच होते. काही काळानंतर आॅलिम्पिक स्पर्धेसाठी दत्तू रवानादेखील झाला. अमेरिकेत सराव करताना दु:ख उराशी बाळगत आंतरराष्ट्रीय रोर्इंग (नौकानयन) स्पर्धेत सुवर्णपदकही पटकावले. या काळात त्याने फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून आईशी संपर्क साधला असला तरी दैव त्याला साथ देत नव्हते.

अखेर तो सुदिन उजाडला. शुक्रवारी दत्तूने नेहमीप्रमाणे आईशी फोनवरून संवाद साधला असता रूग्णालयातील उपचार आणि दैव बलवत्तर म्हणा आईने हळूहळू का होईना पण आपल्या दत्तूला ओळखले. आई ‘अक्का’ यांनी या संवादात दत्तूला आॅलिम्पिक स्पर्धेसाठी नुसत्याच शुभेच्छा दिल्या असे नाही तर ‘बेटा, देशासाठी पदक पटकावून आणच...’ असा भरभरून आशीर्वाददेखील दिल्याचे दत्तूचे मामा रवींद्र वाकचौरे यांनी सांगितले. त्यावेळी दत्तूच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. आई पूर्वपदावर येत असल्याचा दत्तूचा आनंद काही औरच होता.