शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

बेस्टच्या धडकेत बाइकस्वार ठार!

By admin | Updated: February 16, 2017 04:56 IST

बेस्ट बसने बाइकला दिलेल्या धडकेत एका २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मालाडमध्ये मंगळवारी संध्याकाळी हा प्रकार घडला.

गौरी टेंबकर-कलगुटकर / मुंबईबेस्ट बसने बाइकला दिलेल्या धडकेत एका २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मालाडमध्ये मंगळवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. मालवणी पोलिसांनी बस चालकाला अटक केली आहे.साबीर खान असे या मयत तरुणाचे नाव आहे. तो मंगळवारी त्याचा मित्र सोनू याच्यामागे बाइकवर बसून मढ फिरण्यासाठी गेला होता. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास हे दोघे मालवणीतील घराच्या दिशेने परतत होते. त्याच वेळी रूट क्रमांक २६९ ची गोराई डेपोची बस बोरीवलीवरून मढच्या दिशेने जात होती. आक्सा गावाजवळ भरधाव वेगात असलेल्या बाइकला या बसची जोरदार धडक लागली. त्यामुळे बाइकवर बसलेले सोनू आणि साबीर हे गंभीररीत्या जखमी झाले. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, या दोघांना स्थानिक रुग्णालयात दाखल केले. मात्र, साबीरची स्थिती गंभीर असल्याने, त्याला मुंबई सेंट्रलच्या नायर रुग्णालयात हलविण्यात आले. बुधवारी उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली, तर सोनूवर कांदिवलीतील आॅस्कर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची स्थितीदेखील गंभीर असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातप्रकरणी बेस्ट बसचा चालक प्रदीप कास्टो (५२)वर गुन्हा दाखल करत, त्याला अटक केली आहे. जो मूळचा नालासोपाराचा रहिवासी आहे. दरम्यान, साबीरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.