शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलासाठी लाभार्थी धडकले नगर परिषद कार्यालयावर !

By admin | Updated: August 19, 2016 16:48 IST

शासनाच्या सर्वांसाठी घरे या संकल्पनेवर आधारीत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत दाखल प्रस्ताव नगर परिषदेने तातडीने निकाली काढण्याच्या मागणीसाठी घरकुल

ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. १९  - शासनाच्या सर्वांसाठी घरे या संकल्पनेवर आधारीत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत दाखल प्रस्ताव नगर परिषदेने तातडीने निकाली काढण्याच्या मागणीसाठी घरकुल लाभार्थी मानवी हक्क सुरक्षा दलाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी वाशिम नगर परिषद कार्यालयावर धडक दिली. यावेळी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

सर्वांसाठी घरे या संकल्पनेवर आधारीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वाशिम शहरातील पंचशिल नगर, जुना बैल बाजार, माहुरवेश, दत्तनगर, बागवानपुरा, सौदागरपुरा, शुक्रवारपेठ, विटभट्टी परिसरासहीत शहरात इतरही भागात या योजनेचा लाभ मिळण्याकरीता यापूर्वी लाभार्थींनी १६ मे २०१६ रोजी घर बचाव घर बनाओ आंदोलन करुन न.प. कार्यालयाकडे पाठपुरावा केला होता. या आंदोलनाची दखल घेवून उपविभागीय अधिकाऱ्यांनी न.प. कार्यालयाला पत्र देवून कार्यवाही करुन अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या.

अद्याप याबाबत ठोस कार्यवाही नसल्याने मानवी हक्क अभियान व लाभार्थ्यांनी शुक्रवारी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करून हा मुद्दा निदर्शनात आणून दिला. मानवी हक्क सुरक्षा दलाचे अध्यक्ष जगदीश इंगळे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. रेखा रणबावळे, प्रदेशाध्यक्षा भारती डुरे, जिल्हा अध्यक्ष आत्माराम सुतार आदींनी मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, यावर निश्चित तोडगा काढला जाईल, असे आश्वासन मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी दिले.