शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा सुविधांची चौपट दरवाढ मागे

By admin | Updated: May 14, 2014 05:54 IST

महापालिकेचे मैदान, तलाव, व्यायामशाळा, टेनिस कोर्ट आदी क्रीडा सुविधांच्या भाडेदरात थेट तिप्पट ते चौपट वाढ केली आहे

पिंपरी : महापालिकेचे मैदान, तलाव, व्यायामशाळा, टेनिस कोर्ट आदी क्रीडा सुविधांच्या भाडेदरात थेट तिप्पट ते चौपट वाढ केली आहे. ही दरवाढ कमी करून ती केवळ दुप्पट करण्याचा निर्णय महापालिकेच्या स्थायी समितीने आज घेतला. यासंदर्भात सर्वप्रथम ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करीत या अन्याय्य दरवाढीस वाचा फोडली होती. भाडे दरवाढीबाबत क्रीडा क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेक प्रशिक्षक व क्रीडा संघटनांच्या पदाधिकार्‍यांच्या याबाबतच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्याची दखल घेत स्थायी समितीने हा निर्णय घेतला. नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद पॉलिग्रास हॉकी स्टेडिअमचे दिवसाचे भाडे दीड हजारवरून थेट सहा हजार रुपये केले. जलतरण तलावाच्या वार्षिक पासचा दर हजारवरून थेट साडेचार हजार करण्यात आला. दरवाढ अशी भरमसाट न करता टप्प्याटप्प्याने करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला. हॉकी मैदानाचे भाडे अडीच हजार तर, तलावाचा वार्षिक पास २ हजार रुपयांचा करण्याचा निर्णय समितीने घेतला. याच पद्धतीने इतर दर कमी करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे खेळाडू व प्रशिक्षकांना दिलासा मिळाला आहे. महापालिकेच्या नव्या क्रीडा धोरणानुसार ही दरवाढ केली गेली आहे. त्याची अंमलबजावणी १० एप्रिलपासून सुरू झाली आहे. त्यामुळे अनेकांनी स्पर्धा संयोजनाचा निर्णय रद्द केला होता. तसेच, उन्हाळी शिबिराची संख्या घटली होती. क्रीडा क्षेत्रात या संदर्भात तीव्र रोष पसरला आहे. या दरवाढीस स्थायी समितीचे अध्यक्ष महेश लांडगे यांनी यापूर्वीच विरोध दर्शविला होता. दरवाढ मागे घेण्याचे पत्र त्यांनी आयुक्त राजीव जाधव यांना दिले होते. क्रीडा, विधी, स्थायी असा प्रवास करीत क्रीडा धोरण १८ जानेवारीच्या सर्वसाधारण सभेत मंजुर झाले. त्यानुसार क्रीडा सुविधा व सेवाच्या दरात वाढ झाली. आयुक्ताकडून अंतिम मंजुरीस विलंब झाल्याने ती १ ऐवजी १० एप्रिलपासून प्रत्यक्ष लागू केली गेली. त्यास तीव्र विरोध झाल्याने ही बाब नगरसेवकांच्या लक्षात आली. (प्रतिनिधी)