शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

शेवटच्या दिवशी हक्कभंग!

By admin | Updated: April 11, 2015 00:13 IST

शिवसेनेचे जळगाव जिल्ह्णातील आमदार गुलाबराव पाटील यांनी आज महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध तर आंतरराज्य प्रकल्पाचा करार

मुंबई : शिवसेनेचे जळगाव जिल्ह्णातील आमदार गुलाबराव पाटील यांनी आज महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध तर आंतरराज्य प्रकल्पाचा करार तत्कालिन आघाडी सरकारने करताना महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देण्याचे मान्य केले होते या विधानावरून राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध विधासभेत अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी हक्कभंग प्रस्ताव मांडला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे शुक्रवारी सूप वाजले तरी शिवसेना-भाजपा युतीमधील विसंवादाची दरी कमी झाली नाही.डिसेंबर २०१४ च्या नागपुरातील हिवाळी अधिवेशनात अवैध वाळू उपसा प्रकरणी सावनेर येथील एसडीओ आणि तहसिलदार यांना तत्काळ निलंबित करण्यात येईल, अशी घोषणा महसूल मंत्री खडसे यांनी केली होती. मात्र चार महिने उलटले तरी हे निलंबन केलेले नाही. सभागृहात दिलेले आश्वासन खडसे यांनी न पाळणे हा या सार्वभौम सभागृहाचा अवमान असल्याचे सांगत गुलाबराव पाटील यांनी खडसेंविरुद्ध हक्कभंग मांडला.मुख्यमंत्र्यांविरुद्ध हक्कभंगदमणगंगा-पिंजाळ व पार-तापी-नर्मदा नदीजोड या महाराष्ट्र-गुजरात नदीजोड आंतरराज्य प्रकल्पाचा करार तत्कालिन आघाडी सरकारने आंतरराज्य करार करताना महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देण्याचे मान्य केले होते, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. पण यासंदर्भात कागदोपत्री पुरावे कुठेही नाहीत. शिवाय, आता नवीन सरकार एक थेंबही पाणी गुजरातला देणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले असले तरी प्रत्यक्षात जवळपास ६० टक्के पाणी दिले जात आहे, असे सांगून आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांनी सभागृहाची दिशाभूल केल्याचे सांगत त्यांच्याविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. (विशेष प्रतिनिधी)