शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

कॅमेऱ्यांचा छंदच ठरला वरदान

By admin | Updated: September 15, 2016 04:03 IST

असे म्हटले जाते की, ‘छंद’ माणसाला कशासाठी जगायचं हे शिकवतात. अगदी याचप्रमाणे नाशिकच्या तरुण शास्त्रज्ञाने आपल्या छंदाला दूरदृष्टी देत इतरांचे आयुष्य प्रकाशमान करण्यासाठी

सतीश डोंगरे,  नाशिकअसे म्हटले जाते की, ‘छंद’ माणसाला कशासाठी जगायचं हे शिकवतात. अगदी याचप्रमाणे नाशिकच्या तरुण शास्त्रज्ञाने आपल्या छंदाला दूरदृष्टी देत इतरांचे आयुष्य प्रकाशमान करण्यासाठी जगण्याचा मार्ग शोधला. अशा या छंदवेड्या शास्त्रज्ञाच्या संशोधनाची अमेरिकेलाही दखल घ्यावी लागली. नाशिकच्या पुरुषोत्तम इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये शिक्षण घेतलेल्या रमेश रासकर या ४५ वर्षीय तरुण शास्त्रज्ञाला लहानपणापासूनच कॅमेऱ्यांचा छंद होता. वेगवेगळ्या प्रकारचे कॅमेरे हाताळणे, छायाचित्र टिपणे याची त्यांना प्रचंड आवड होती. तसेच इतरही गॅझेट्स हाताळणे त्यांना आवडत असे. शाळेत हुशार विद्यार्थी अशी त्यांची ओळख असल्याने शिक्षकही त्यांच्या चिकित्सकवृत्तीचे कौतुक करीत असत. अभ्यासात हुशार त्यातही गणित आणि विज्ञान हे दोन विषय आवडीचे असल्याने त्यांच्यातील संशोधक वृत्ती कधीच लपून राहिली नाही. आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार असलेल्या रमेशला संशोधनासाठी नेहमीच पाठबळ मिळाले. पुढे ते बारावीत राज्यात प्रथम आल्याने त्यांनी संशोधन क्षेत्रात स्वत:ला वाहून घेतले. पुणे येथे कॉम्युटर इंजिनिअरिंग केल्यानंतर त्यांनी थेट अमेरिका गाठली. तिथे एमआयटी मीडिया लॅबमध्ये कॅमेरा कल्चर रिसर्च हा ग्रुप स्थापन करून आपल्या संशोधनाला दिशा दिली; मात्र हे संशोधन जगभरातील नागरिकांना लाभदायक ठरावे हा ध्यास समोर ठेवून त्यांनी वाटचाल करण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी आपला लहानपणाचा ‘कॅमेऱ्याचा छंद’ हाच संशोधनाचा मुख्य घटक ठेवला. त्यांनी एक आगळा-वेगळा कॅमेरा विकसित केला. या कॅमेऱ्याच्या एका बाजूला मोबाइल फोन ठेवून मोबाइलच्या स्क्रीनवरील सुस्पष्ट अक्षरांवरून चष्म्याचा नंबर काढण्याची किंवा डोळ्यांची तपासणी करण्याची किमया या प्रयोगामुळे शक्य झाली. काही काळातच रासकर यांची ही प्रणाली अमेरिकेत ‘आयनेत्र प्रणाली’ नावाने ओळखली गेली. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या त्याच्या चाचण्यांमध्ये अचूक निदान समोर आले. या उपकरणाचा आणखी फायदा म्हणजे काही मिनिटांतच हे उपकरण मोतीबिंदूचे निदान करते. मोतीबिंदूसाठी एडगेटर्न यांनी लावलेल्या शोधापेक्षाही रासकर यांचा शोध अधिक वेगवान असल्याने अमेरिकेत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.