शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

गटारे नसल्याने बेकरे गावातील सांडपाणी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2016 03:08 IST

माणगाव ग्रामपंचायत हद्दीतील बेकरे गावातील मुख्य रस्त्यावर अद्याप गटारेच बांधण्यात आली नसल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे.

नेरळ : कर्जत तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायत हद्दीतील बेकरे गावातील मुख्य रस्त्यावर अद्याप गटारेच बांधण्यात आली नसल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. हे सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून परिणामी ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या मुख्य रस्त्यावर सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटारे बांधण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे दामत विभाग अध्यक्ष जयेंद्र कराळे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.बेकरे गावातील रस्त्यावर आजवर गटारेच काढली नाहीत. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. ग्रामपंचायतीने काहीच उपाययोजना केली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सरपंचांनी नेहमीच गावाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे गावातील अनेक समस्या प्रलंबित असल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावातील मुख्य रस्त्यावर सांडपाणी वाहत असल्याने ग्रामस्थांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतीच्या अनेक वेळा निदर्शनास आणूनही अद्याप यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. ग्रामपंचायतीने मुख्य रस्त्यावर गटारे बांधावीत, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. (वार्ताहर)>बेकरे गावातील रस्त्याच्या बाजूला गटारे बांधण्यासाठी अनेक वेळा रस्त्याची पाहणी केली आहे; परंतु येथील ग्रामस्थ अडथळा निर्माण करीत आहेत. अनेक शेतक ऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे यासंदर्भात तक्र ार केली आहे. जर ग्रामस्थांनी गटारे बांधण्यासाठी सहकार्य केले तर गटारांची कामे सुरू करण्यात येतील. यासाठी तक्र ारदाराने पुढाकार घ्यावा.- कल्पना पारधी, सरपंच, माणगाव ग्रामपंचायत