शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय हस्तक्षेपामुळेच मारेकरी मोकाट फिरत आहेत

By admin | Updated: April 30, 2015 13:22 IST

राजकीय हस्तक्षेपामुळे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचे मारेकरी मोकाट फिरत असल्याचा आरोप कॉ. पानसरे, डॉ. दाभोलकर आणि सतीश शेट्टी यांच्या नातेवाइकांनी आज एका चर्चासत्रात केला.

मुंबई : राजकीय हस्तक्षेपामुळे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचे मारेकरी मोकाट फिरत असल्याचा आरोप कॉ. पानसरे, डॉ. दाभोलकर आणि सतीश शेट्टी यांच्या नातेवाइकांनी आज एका चर्चासत्रात केला.मुंबईच्या प्रेस क्लबमध्ये बुधवारी ‘हम आझादीयोंके हकमें’ संस्थेतर्फे चर्चासत्र पार पडले. त्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची मुलगी मुक्ता, कॉम्रेड गोविंद पानसरे यांची सून मेघा आणि आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांचे भाऊ संदीप शेट्टी या तिघांनी व्यवस्थेविरोधात रोष व्यक्त केला.मेघा पानसरे म्हणाल्या, की कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येच्या तपासाबाबत पोलीस आम्हाला कोणतीही माहिती देत नाहीत. हत्येवेळी धर्मांध शक्तींसोबत त्यांचे वैचारिक मतभेद सुरू होते. पोलिसांना ही माहिती देऊनही कौटुंबिक आणि भांडवलदारांसोबत असलेले मतभेद या मुद्द्यांवर तपास सुरू आहे. परिणामी हत्येचा तपास न्यायालयाच्या नियंत्रणाखाली नेमलेल्या विशेष चौकशी समितीने करावा, ही कुटुंबीयांची मागणी होती. मात्र न्यायालयात याचिका दाखल करताच सरकारने स्वतंत्र विशेष चौकशी समिती नेमली. यावरून न्यायालयाच्या नियंत्रणाखालील समिती सरकारला मान्य नाही, असा त्यांनी आरोप केला. संदीप शेट्टी यांनी सांगितले, की सतीश शेट्टी हत्येमध्ये सीबीआयच्या अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असल्याचे निदर्शनास आले. शुक्रवारी भक्कम पुरावा मिळाल्याचा दावा करणारा अधिकारी सोमवारी तपास थांबवतो. न्यायालयात ठोस पुरावे सादर केल्यानंतरही त्यांचा विचार केला जात नाही. त्यामुळे यंत्रणेसोबत लढून काहीही उपयोग होणार नाही; मात्र लढा देण्याचे काम सुरूच ठेवावे लागेल.मुक्ता दाभोलकर यांनी शेट्टी यांचे समर्थन करीत तपासाबाबत राजकीय इच्छाशक्तीच्या विरोधात रोष व्यक्त केला.