शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

‘देखणी’ काव्यसंग्रह कोकणी भाषेत

By admin | Updated: May 31, 2016 01:57 IST

ज्ञानपीठ विजेते प्रसिद्ध लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्यकृतींची भुरळ अनेकांना नेहमीच पडली आहे. त्यांचे साहित्य इतर भाषांमध्ये अनुवादित होण्याचे प्रमाणही वाढत आहे.

पुणे : ज्ञानपीठ विजेते प्रसिद्ध लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्यकृतींची भुरळ अनेकांना नेहमीच पडली आहे. त्यांचे साहित्य इतर भाषांमध्ये अनुवादित होण्याचे प्रमाणही वाढत आहे. नेमाडे यांचा ‘देखणी’हा प्रसिद्ध काव्यसंग्रह लवकरच कोकणी भाषेत प्रकाशित होत असून, त्यांच्या या साहित्यकृतीचा रसास्वाद आता गोवेकरांनाही घेता येणार आहे. देशीवादाच्या सिद्धांताबरोबरच आपल्या दर्जेदार साहित्याने भारतीय साहित्यक्षेत्रात वेगळा मानदंड निर्माण करणाऱ्या नेमाडे यांच्या देखणीचा काव्यानुवाद संत तुकारामांच्या निवडक अभंगाचे आणि रवींद्रनाथ टागोरांच्या संपूर्ण गीतांजलीचे सहितसाठी सुबोध कोकणी अनुवाद करणारे साहित्य अकादमी प्राप्त गोव्यातील ज्येष्ठ कवी रमेश वेळुस्कर यांनी केला आहे. ‘देखणी’तील कविता या प्रामुख्याने त्यांच्या गोव्यातील वास्तव्यात लिहिलेल्या आहेत. गोव्यातील वास्तव्य हे नेमाडे यांच्यासाठी नेहमीच आनंदाचा भाग राहिला आहे. नेमाडे यांच्या कोकणी भाषेवरील प्रेमामुळे ‘नेमाडे सहितोत्सव’ आणि त्यांच्या निवडक कवितांच्या विशेष पोस्टरच्या यशस्विततेनंतर ‘सहित’च्या वतीने आता त्यांचा ‘देखणी’ हा काव्यसंग्रह कोकणीमध्ये आम्ही प्रकाशित करत आहोत. त्यांच्या ७८व्या वाढदिवसानिमित्त हा अनुवाद म्हणजे आम्हा नेमाडेप्रेमींकडून त्यांना छोटीशी भेट देण्याचा प्रयत्न असल्याचे सहित प्रकाशनचे व्यवस्थापकीय संपादक किशोर शिंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)