शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षण दलातील महिलांनाही मिळावा कायद्याचा आधार

By admin | Updated: August 24, 2016 05:04 IST

संरक्षण दलातील महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही लैंगिक अत्याचार आणि बलात्कार प्रकरणी सरकारी महिला कर्मचाऱ्यांप्रमाणेच वैद्यकीय रजा व उपचारात सवलत मिळावी

मुंबई : संरक्षण दलातील महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही लैंगिक अत्याचार आणि बलात्कार प्रकरणी सरकारी महिला कर्मचाऱ्यांप्रमाणेच वैद्यकीय रजा व उपचारात सवलत मिळावी, अशी मागणी शिवसेना नेत्या आणिं आमदार नीलम गोऱ्हे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. बीड येथे २०१० साली उच्चपदस्थ लष्करी महिला अधिकाऱ्यावरील सामूहिक बलात्कारप्रकरणी मोक्का न्यायालयाने चार आरोपींना जन्मठेप आणि दहा लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावली. यासंदर्भात बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, सहा वर्षानंतर या महिलेला न्याय मिळाला असला तरी संरक्षण दल, पोलीस दल आदी अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत असणाऱ्या महिलांच्या कायदेशीर अधिकारांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारी कर्मचारी असणाऱ्या महिलांवर बलात्कार व लैंगिक अत्याचार झाल्यास तीन महिन्यांची रजा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र, यात सैन्य व पोलिस दलासारख्या अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे पीडितांना या सवलती मिळत नाहीत, असे त्या म्हणाल्या. (प्रतिनिधी)