शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

स्पेशल म्हणून खव्याचीच बर्फी

By admin | Updated: September 22, 2016 03:29 IST

महागड्या दरात मावा किंवा खव्याची विक्र ी केली जात असल्याची बाब ठाणे अन्न आणि औषध प्रशासन विभागाने गणेशोत्सवात केलेल्या कारवाई समोर आली

पंकज रोडेकर,

ठाणे- कायद्याच्या पळवाटा शोधून ठाणे आणि रायगड या जिल्ह्यात बेधडक पणे स्पेशल बर्फीच्या नावाखाली ४०० ते ५०० रुपये दराने महागड्या दरात मावा किंवा खव्याची विक्र ी केली जात असल्याची बाब ठाणे अन्न आणि औषध प्रशासन विभागाने गणेशोत्सवात केलेल्या कारवाई समोर आली आहे. त्यामुळे ठाणे आणि रायगडकर नागरिकांनो यापुढे सावधान. ही स्पेशल बफर् ी अहमदाबाद येथून १०, २० किंवा ३० रूपये किलो दराने अशी पोत्यातून कोकणात येत आहे.ती मिळेल त्या जागेत ठेवून विक्रेते त्यामार्फत अधिक नफा कमविण्याच्या नादात नागरिकांच्या जीवाश्ी खेळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यंदा गणेशोत्सवात आणि त्यापूर्वीच ठाणे एफडीएने विशेष मोहीम हाती घेतली होती. याचदरम्यान ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि अंबरनाथ तसेच रायगड येथे टाकलेल्या तीन छाप्यात एकूण ८ लाखांचा मावा- खवा जप्त केला होता. त्यामधील कल्याण आणि अंबरनाथ येथे हा खवा अस्वच्छता असलेल्या ठिकाणी साठवून ठेवल्याचे समोर आले. मात्र, तो आता नष्ट करण्यात आला आहे. ही मोहिम राबविताना, एफडीएच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीच्या प्रत्येक ठिकाणीहून मावा-खव्यांचे नमुने घेतलेले आहेत. यंदा कोकणात स्पेशल बर्फीच्या नावाखाली जो काही प्रकार सुरु झालेला आहे. त्याला वेळीच निर्बंध घालण्यासाठी एफडीएने जणू दंड थोपटले आहेत. कोकणात अशाप्रकारे बर्फी येत असण्याचे उघड झाल्यावर त्याकडे विशेष लक्ष केंद्रीत करुन ठाणे एफडीएने तपासणी मोहीम तीव्र करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी नमुने घेणे सुरू केले असून ही तपासणी मोहिम आगामी दिवाळीच्या कालावधीपर्यंत राबविण्यात येणार आहे. ही पद्धत वेळीच बंद करण्याचा पुरेपुर प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.>आदेशानुसार कारवाई जोरातगणेशोत्सवात कोकण विषबाधेची एकही घटना नाही. गणेशोत्सवात कोकणातील एकाही जिल्ह्यात विषबाधाची घटना घडली नसल्याचा दावा एफडीए ने केला. वरिष्ठांचे आदेशाचे पालन करून मिठाईच्या प्रत्येक दुकानात जाऊन पाहणी केली. तसेच करवाई करण्यास मागे पुढे पाहिले नसल्याचे एफडीएकडून सांगण्यात येत आहे.>नागरिकांना चांगला आणि दर्जेदार मावा- खवा मिळावा. म्हणून स्पेशल बर्फीची बाब पुढे आल्यावर तत्काळ संबंधित विभागाच्या सहायक आयुक्तांना प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. - सुरेश देशमुख -सह आयुक्त एफडीए (कोकण विभाग)