शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

हस्तकलेतून बाप्पाची इको फ्रेंडली आभूषणे

By admin | Updated: August 22, 2016 03:24 IST

जीवसृष्टीवर तसेच पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम आणि त्यामुळे भविष्यात निर्माण होणारे निसर्ग संकट याविषयी सर्वच स्तरातून जनजागृती केली जात आहे

प्राची सोनवणे,

नवी मुंबई- सण असो वा उत्सव तो साजरा करताना होणारे प्रदूषण, आजूबाजूच्या जीवसृष्टीवर तसेच पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम आणि त्यामुळे भविष्यात निर्माण होणारे निसर्ग संकट याविषयी सर्वच स्तरातून जनजागृती केली जात आहे. मुंबईतील अशाच काही महिलांनी निसर्गसंपत्तीचे रक्षण करण्यासाठी पुढाकार घेतला असून गणेशोत्सवातील संपूर्ण सजावट ही इको फ्रेंडली कशी करता येईल यादृष्टीने सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे.शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या गणेशमूर्तींबरोबरच सोलावूडमधून गुंफलेल्या मोगऱ्याच्या कळ्या, ड्युप्लेक्स कागदापासून साकारलेले आकर्षक गुलाब पुष्प, कापडापासून तयार केलेली लेस तसेच कार्डपेपरचा वापर अशी नानाप्रकारची पर्यावरणस्नेही आभूषणे यंदा बाप्पाच्या अंगावर पाहावयास मिळणार आहेत. हस्तकलेची आवड असणाऱ्या प्रीती कदम यांनी त्यांच्या कलेचा वापर करून पर्यावरण संवर्धनाला कशाप्रकारे हातभार लावता येईल यादृष्टीने आतापर्यंत पाचशेहून अधिक इको फ्रेंडली मखर तयार केले आहेत. बाप्पाच्या सजावटीच्या साहित्यामध्ये सोलावूडपासून लहान-मोठ्या आकाराच्या मोगऱ्याच्या कळ्या, ड्युप्लेक्स कागदापासून साकारलेली गुलाबाची फुले, विविधरंगी कापडाची लेस यांचा वापर करून मुकुट, तोडे, बाजूबंद, कंठी आदी आभूषणे तयार केली आहेत. गणेशोत्सवात प्लास्टीकची फुले, वेली, मणी आणि खड्यांनी सजविलेल्या कंठ्या खरेदी केल्या जातात. त्या पर्यावरणाला घातक ठरत असल्याने पर्यावरणस्नेही साहित्यापासून आभूषणे बनविण्याचा निर्णय घेतल्याचे प्रीती कदम यांनी सांगितले. >मागणीत वाढघरकाम करणाऱ्या पंधरा महिलांनाही दागिने बनविण्याचे प्रशिक्षण दिले आहे. या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना रोजगाराची संधी मिळाली आहे. फावल्या वेळात १५ महिला सध्या बाप्पाची आभूषणे तयार करत असून बाहेर मिळणाऱ्या कृत्रिम आभूषणांच्या तुलनेत ही पर्यावरणस्नेही आभूषणे स्वस्त दरात उपलब्ध असून दरवर्षी त्यांची मागणी वाढत आहे.