शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

खर्डीतील बाप्पा निघाले मुंबईला

By admin | Updated: August 25, 2016 03:10 IST

मूर्तिकार रामभाऊ जाधव बुवा यांच्या कारखान्यात गणेशमूर्तींवर रंगरंगोटीचा शेवटचा हात फिरवला जातोय.

मनीष दोंदे,

खर्डी- येथील दळखण चक्र भागात राहणारे मूर्तिकार रामभाऊ जाधव बुवा यांच्या कारखान्यात गणेशमूर्तींवर रंगरंगोटीचा शेवटचा हात फिरवला जातोय. यंदा त्यांच्या कारखान्यात बाजीरावाच्या वेशातील बाप्पाच्या मूर्तींना जास्त मागणी आहे. पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन येथे शाडूच्या मूर्तींना जास्त मागणी असल्याने प्लास्टर आॅफ पॅरिसच्याही मूर्ती कमी बनवाव्या लागतात, असे रामभाऊ यांचा मोठा मुलगा अर्जुन याने सांगितले.या मूर्ती केवळ हाताने बनवत असल्याने त्यातील कलाकुसर देखणी व बघण्यासारखी असल्याने त्यांनी बनवलेल्या मूर्तींना खर्डी परिसराबरोबरच कसारा, शहापूर, डोळखांब, मुरबाड, वाडा, कल्याण, डोंबिवली, ठाणे, तसेच चेंबूर (मुंबई) आदी ठिकाणांवरून मागणी असते. साधारण दोन महिने अगोदर पाहिजे असलेल्या मूर्तींचे फोटो आणि पाट येथील कारखान्यात दिले जातात. त्यात्या फोटोप्रमाणे बाप्पांची मूर्ती बनवली जाते. सुमारे ३५ वर्षांपूर्वी रामभाऊंनी बाप्पाच्या मूर्ती बनवण्याच्या कारखान्याला आपल्या छोट्याशा घरात सुरु वात केली होती. त्यांची पत्नी त्यांना माती मळून देण्यासाठी मदत करीत असे. आता या कामात दोन्ही मुले मदत करतात. या कारखान्याच्याच आधारावर ते आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवतात. अल्पसे शिक्षण झालेल्या रामभाऊंनी मुंबईत राहत असताना मूर्ती बनण्याची कला, कारखान्यात माती मळणे आदी कामे करत असताना आत्मसात केली. त्यासाठी कुठेही शिक्षण घेतले नाही. मात्र, जिद्द आणि उपजत असलेल्या कलेमुळे या क्षेत्राकडे वळले. आज आपण मुंबई येथील मंत्रालयाशेजारील असणाऱ्या आमदार निवासावर जे राजमुद्रा असलेले चिन्ह पाहतो, ते रामभाऊंनी बनवलेले आहे.या कामात आता खूपच बदल झाले आहेत. मूर्ती बनवण्याचा खर्चसुद्धा खूपच वाढला आहे. यासाठी लागणारी माती गुजरातमधील भावनगर येथून आणावी लागते. तेथून आणण्यासाठी वाहतूक खर्च जास्त लागत असल्याने कल्याणातील एका व्यापाऱ्याकडून ती खरेदी केली जाते. पूर्वी ३५ किलोच्या एका गोणीला ३० रु पये लागत. मात्र, आता त्याच गोणीला साडेपाचशे रु पये मोजावे लागतात. रंगांचेही भाव गगनाला भिडले आहेत. केवळ आपली कला पुढच्या पिढीने पुढे जोपासावी व बाप्पाची सेवा करावी, हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून कारखाना सुरू ठेवल्याचे रामभाऊंनी सांगितले.