शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

बँकेच्या ‘कॅश व्हॅन’चा वापर चोरीसाठी !

By admin | Updated: June 11, 2016 04:25 IST

बँकेचे कोट्यवधी रुपये घेऊन जाणारे ‘कॅश व्हॅन’चे कर्मचारी या व्हॅनचा वापर वाहन चोरीसाठी करीत असल्याचे भांडुपमध्ये समोर आले

मनीषा म्हात्रे,

मुंबई- बँकेचे कोट्यवधी रुपये घेऊन जाणारे ‘कॅश व्हॅन’चे कर्मचारी या व्हॅनचा वापर वाहन चोरीसाठी करीत असल्याचे भांडुपमध्ये समोर आले. त्यांचा हा प्रताप सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यामुळे व्हॅनमधून ने - आण करण्यात येणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. भांडुप परिसरात गेल्या काही दिवसांपासून बाईक, सायकल चोरीचे प्रकार वाढले होते. डकलाइन रोड येथील प्रकाश नवले यांच्या घराबाहेरील दोन सायकल बुधवारी रात्री गायब झाल्या. परिसरात शोधाशोध घेऊनही सायकली मिळाल्या नाहीत. अखेर येथील रेकॉर्डिंग स्टुडिओबाहेर असलेल्या सीसीटीव्हीकडे नवलेंचे लक्ष गेले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर वाहनचोरीचा संशय येऊ नये म्हणून कॅश व्हॅनचा वापर केल्याचे स्पष्ट झाले. या फुटेजमध्ये रात्री दीडच्या सुमारास लुटारू कॅश व्हॅनमधून या परिसराची रेकी करीत असल्याचे स्पष्ट झाले. त्याच दरम्यान बाजूने येत असलेली पोलिसांची गाडी पाहून ते लपले. त्यानंतर पोलीस जाताच तेथील सायकल कॅश व्हॅनमध्ये भरून लुटारूंनी पळ काढला. त्यांचा प्रताप येथील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. स्थानिकांनी थेट भांडुप पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून भांडुप पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. मात्र पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच या लुटारूंनी चोरीला गेलेली सायकल पुन्हा नवले यांच्या घरासमोर नेऊन ठेवली. त्यानंतर लुटारूंनी कुटुंबीयांना तक्रार मागे घ्यावी म्हणून धमकावल्याची माहिती नवलेंनी ‘लोकमत’ला दिली. त्यात लूट करणारे हे कॅश व्हॅनचालक असल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित सीसीटीव्ही फुटेजवरून भांडुप पोलीस अधिक तपास करीत आहेत. अनेकदा या वाहनांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडूनच दरोड्याचे प्रकार समोर आले आहेत. (प्रतिनिधी)यापूर्वीच्या घटना...१६ जानेवारी २०१५ - विलेपार्ले येथील बँकेच्या कॅश व्हॅनवर दरोडा टाकण्यात आला. या दरोड्यात कोट्यवधींची रोकड दरोडेखोरांनी लुटली होती. विलेपार्लेहून उपनगर भागात तब्बल दोन कोटी रुपये घेऊन जात असताना गाडीवर दरोडा टाकण्यात आला होता. यामध्ये गाडीवरील कर्मचाऱ्याचा हात होता.९ एप्रिल २०१५ - माटुंग्यात १ कोटी ४४ लाख रुपयांची रोकड घेऊन कॅश व्हॅनचालक पसार झाला होता. त्यानंतर यातील काही रक्कम काढून अटकेच्या भीतीने व्हॅन माटुंगा, सात रस्ता येथे सोडून त्याने पळ काढला.