शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात ३०० कोटींचे बँक व्यवहार ठप्प

By admin | Updated: July 29, 2016 18:13 IST

केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी सरकारी बँकांच्या कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या आजच्या एक दिवसाच्या संपामुळे सोलापूर जिल्ह्यातील ३०० कोटी रूपयांचे

सरकारी बँकांचा संप : साडेतीन हजार कर्मचाऱ्यांचा सहभागसोलापूर : असोसिएट बँकांचे स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये विलीनीकरण करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी सरकारी बँकांच्या कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या आजच्या एक दिवसाच्या संपामुळे सोलापूर जिल्ह्यातील ३०० कोटी रूपयांचे बँक व्यवहार ठप्प झाले. जिल्ह्यातील विविध सरकारी बँकांच्या २६० शाखांमधील ३५०० कर्मचाऱ्यांनी या संपात भाग घेतला होता.युनायटेड फोरम आॅफ बँक असोसिएशनच्या नेतृत्त्वाखाली देशभरात हा संप पुकारण्यात आला होता. विविध संघटनांशी संबंधित असलेले सुमारे दोनशे कर्मचारी बाळीवेस येथील स्टेट बँकेसमोरजमा झाले. तेथे त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून दीड तास निदर्शने केली. जिल्ह्यातील बँकांमधील धनादेश क्लिअरींग, रक्कम काढणे, भरणे, आरटीजीएस आदी सर्व सेवा बंद असल्यामुळे नागरिकांची तारांबळ झाली.युनायटेड फोरमचे निमंत्रक गोपाळ गायकवाड यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या या धोरणामुळे सरकारी बँका बंद होतील. स्पर्धेमुळे सामाजिक बँकींग प्रभावित होईल. देशाच्या आर्थिक विकासात बँकांची भूमिका मोठी आहे. यामुळे विकासावरही विपरित परिणाम होईल. एकाच बँकेत सर्व बँका विलीन होणार असल्यामुळे एकाधिकार वाढीस लागेल. बँकांमध्ये काम करणारे हजारो कर्मचारी आणि अधिकारी अतिरिक्त होतील. त्यामुळे केंद्र सरकारने आपल्या निर्णयाचा फेरविचार करून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना बळकट केले पाहिजे.या आंदोलनात गायकवाड यांच्यासह प्रकाश जाधव, वीरभद्र माळगे, अंबिका डोळ्ळे, रजनी कुलकर्णी, रोहिणी दुस्सल, अलमेदा, जयतीर्थ पडगानूर, अधिकारी संघटनेचे धनंजय शेंडे, अंगद पाटील यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.