शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाच्या बहाण्याने बँकेची फसवणूक

By admin | Updated: October 20, 2016 02:57 IST

बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेवून बँकेची फसवणूक झाल्याचा प्रकार घणसोली येथे उघडकीस आला आहे.

नवी मुंबई : बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेवून बँकेची फसवणूक झाल्याचा प्रकार घणसोली येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे वैयक्तिक कर्ज घेवून त्याची परतफेड न करता बँकेची फसवणूक केली आहे. घणसोली येथील महानगर बँकेच्या शाखेत हा प्रकार घडलेला आहे. सदर बँकेतून वैयक्तिक कर्ज घेवून त्याची परतफेड न करता बँकेची फसवणूक झालेली आहे. नुकताच हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर बँकेच्या तक्रारीनुसार कोपरखैरणे पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये एकूण सहा जणांचा समावेश आहे. त्यांनी वैयक्तिक कर्जासाठी बँकेकडे अर्ज करून संपूर्ण प्रक्रिया केली होती. त्यानुसार एका प्रकरणात पाच लाख तर दुसऱ्या प्रकरणात साडेतीन लाख रुपये बँकेने कर्ज मंजूर करून दिलेले आहे. मात्र कर्ज मंजूर झाल्यानंतर संबंधिताकडून त्याची परतफेड होत नव्हती. त्यामुळे बँकेकडून त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. यावेळी त्यांनी बँकेकडे सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे उघड झाले. तसेच त्यांचे पत्तेही चुकीचे असल्यामुळे त्यांच्याविरोधात बँकेने पोलिसांकडे तक्रार केलेली आहे. त्यानुसार सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)