शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बंदला पाठिंबा फक्त सोशल मीडियावर

By admin | Updated: June 6, 2017 02:25 IST

नवी मुंबईमधील सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी व समाजसेवकांनी सोशल मीडियावरून जोरदार समर्थन केले होते;

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदचे नवी मुंबईमधील सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी व समाजसेवकांनी सोशल मीडियावरून जोरदार समर्थन केले होते; परंतु प्रत्यक्षात शहरातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू असल्याने शेतकरी प्रेम बेगडी ठरले आहे. मुंबई बाजार समितीमधील कर्मचारी व माथाडींनी दोन दिवसांपूर्वी शशिकांत शिंदे यांना अटक होताच मार्केट बंदसाठी सक्ती सुरू केली होती; पण सोमवारी बंदचे आवाहन करूनही सर्व व्यवहार सुरळीत असल्याने त्यांची दुटप्पी भूमिका उघड झाली आहे. माथाडीनेते शशिकांत शिंदे यांना २ जूनला कोरेगावमध्ये आंदोलन केल्यामुळे अटक करण्यात आली होती. त्यांना अटक झाल्याचे वृत्त समजताच त्यांच्या समर्थकांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व मार्केट बंद करण्याचा प्रयत्न केला. व्यापाऱ्यांची इच्छा नसतानाही बळजबरीने मार्केट बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यामध्ये बाजार समितीच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांचाही समावेश होता; परंतु ५ जूनला राज्यभर बंदचे आवाहन केले असताना मुंबई बाजार समितीमधील माथाडी कामगार व बाजार समितीच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांनीही बंदचे आवाहन केले नाही. माथाडी नेते शशिकांत शिंदे व नरेंद्र पाटील यांनीही बंदसाठी आग्रह धरला नाही. नरेंद्र पाटील यांनी बंदमध्ये सहभागी न होण्याची भूमिका घेतल्याचे संदेश सोशल मीडियावरून फिरत होते. शेतकरी संघटना बाजार समितीमधील माथाडी कामगारांकडे पूर्वग्रहदूषित दृष्टीने पाहात असतात. आमच्याविरोधात सातत्याने भूमिका घेत असताना आम्ही का पाठिंबा द्यायचा? असा प्रश्न उपस्थित केला होता. याविषयी त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु संपर्क होऊ शकला नाही. बाजार समितीसह नवी मुंबईमधील सर्वच बाजारपेठा सुरळीत सुरू होत्या. वॉट्स अ‍ॅप व फेसबुकवरून बंदला पाठिंबा जाहीर करणाऱ्या नेत्यांपैकी प्रत्यक्षात बंदमध्ये कोणीही सहभागी झाले नाहीत. एकही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी बंदसाठी प्रयत्न केले नसल्याने बंद पूर्णपणे फसला आहे.