शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
2
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
3
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
4
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
5
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
6
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
7
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
8
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
9
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
10
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
11
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
12
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
13
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
14
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
15
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
16
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
17
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
18
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
19
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
20
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...

४२ डीएड विद्यालयांचा बंदचा प्रस्ताव

By admin | Updated: May 24, 2016 21:16 IST

देशाची पिढी घडवणाऱ्या शिक्षकांच्या डीएड (डीटीएड) विद्यालयांची संख्या शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे घटत चालली आहे.

काशिनाथ वाघमारे

सोलापूर, दि. 24-  देशाची पिढी घडवणाऱ्या शिक्षकांच्या डीएड (डीटीएड) विद्यालयांची संख्या शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे घटत चालली आहे. गरज नसताना एनसीटीई (नॅशनल कौन्सिल आॅफ टीचर एज्युकेशन) ने २००५ ते २०१२ पर्यंत महाराष्ट्र शासनाची एनओसी न घेता खिरापतीप्रमाणे अध्यापक विद्यालये वाटली़ व त्याच अध्यापक विद्यालयांना महाराष्ट्र शासनानेही डोळे झाकून संलग्नीकरण दिले़ त्यामुळे २०१२ अखेर १४०० अध्यापक विद्यालयांची निर्मिती महाराष्ट्रात झाली़ विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याने मात्र आज ही संख्या ४५० वर पोहोचली आहे़ सोलापूर जिल्ह्यात ७४ अध्यापक विद्यालयांपैकी केवळ ३२ विद्यालये कशीबशी जिवंत आहेत. अध्यापन पदविका (डीएड) अभ्यासक्रमाच्या आवेदनपत्रावर व वर्तमान पत्रातून दिल्या जाणाऱ्या जाहिरातीत शासनाने ह्यप्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम डीटीएडमध्ये प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना नोकरी मिळेलच याची खात्री देता येणार नाहीह्ण अशी टीप टाकून अध्यापक विद्यालयांचे अस्तित्व धोक्यात आणण्याचे काम केले आहे़ शासनाने यापूर्वी किंवा आजतागायत कोणत्याही अभ्यासक्रमाबाबत अशी टीप टाकलेली नाही आणि अशी टीप २०१५-१६ मध्ये टाकली व १६-१७ च्या प्रवेश प्रक्रियेत टाकणाऱ म्हणजे यापूर्वीच्या अध्यापन पदविका पूर्ण केलेल्या व बेकार असणाऱ्या पात्र शिक्षकास शासन नोकरी देणार आहे काय ? असा सवाल उपस्थित होत आहे. वेतन श्रेणी प्राथमिकची आणि नियमावली माध्यमिकची अध्यापक विद्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी ही प्राथमिक शिक्षकांची असून, नियम-नियमावली मात्र एसएसकोड १९८१ म्हणजेच माध्यमिक स्तरावरील लागू आहेत़ सदर अध्यापक विद्यालयात प्रवेश घेणारा विद्यार्थी हा १२ वी उत्तीर्ण होऊन येतो़ त्यामुळे पदवीचा विद्यार्थी हा डीएड अभ्यासक्रम पूर्ण करतो़ डीएड पदवी बदलून ती डीटीएड केली़ डीटीएड म्हणजे ह्यडिप्लोमा इन टीचर एज्युकेशनह्ण़ शासनाच्या नियमानुसार आॅल डिप्लोमाज इक्वल इन टू ज्युनियर कॉलेज़ परंतु कनिष्ठ महाविद्यालयाचे कोणतेही नियम डीएडला लागू नाहीत़ यंदापासून प्रवेशप्रक्रिया आॅनलाईन पूर्वी डीएडसाठी आवेदनपत्रे ही कागदोपत्री भरुन घेतली जात होती़ त्यानंतर एकत्रीकरण करुन मेरिट लिस्टद्वारे केंद्रीय पद्धतीने प्रवेश दिला जायचा़ परंतु यावर्षी शासनाने संगणकीय प्रणालीद्वारे आॅनलाईन आवेदन पत्रे भरणे व प्रवेशप्रक्रिया आॅनलाईन पद्धतीनेच करण्याचे निश्चित केले आहे.अध्यापक विद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेकडे गांभीर्याने न पाहिल्यास भविष्यात शिक्षक आयात करावे लागतील़ शिक्षकांचा तुटवडा निर्माण होईल़ त्यामुळे शिक्षणाचा अधिनियम अधिकार २००९ च्या मूलभूत हक्कास सुरुंग लागेल़ त्यामुळे शासनाच्या अशा धोरणामुळे विद्यार्थ्यांच्या पिढ्यान्पिढ्या बरबाद होतील़ - राजेश माळीप्राचार्य, माऊली अध्यापक विद्यालय वडाळा, उत्तर सोलापूर