शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरमध्ये नायलॉन मांज्यावरील बंदी हायकोर्टाकडून कायम

By admin | Updated: January 12, 2015 13:42 IST

घातक नायलॉन मांजावर नागपूर पोलिसांनी टाकलेली बंदी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानेही कायम ठेवली आहे.

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. १२ - घातक नायलॉन मांजावर नागपूर पोलिसांनी टाकलेली बंदी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानेही कायम ठेवली आहे. नायलॉन मांजाच्या वापरावर अंकूश ठेवण्यात पोलिसांना यश आले असले तरी नायलॉन मांजा विकणा-यांवरच कारवाई का केली जात नाही असा सवाल आता उपस्थित होत आहे. 
देशभराप्रमाणे नागपूरमध्येही मकरसंक्रातीचा सण पतंग उडवून साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांपासून पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर वाढला असून हा मांजा जीवघेणा ठरु लागला आहे. नायलॉन मांजामध्ये अडकून गेल्या वर्षी नागपूरमध्ये तिघांचा मृत्यू झाला. तर सुमारे ८०० पक्षी नायलॉन मांजामुळे जखमी झाले होते. यापार्श्वभूमीवर नागपूरचे सहपोलिस आयुक्त अनुपकुमार सिंह यांनी ८ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी घालण्याचा आदेश बजावला होता. पोलिसांच्या या आदेशाला पंतग आणि मांजा व्यावसायिकांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाकडे आव्हान दिले होते. या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. हायकोर्टाने पोलिसांचा आदेश योग्य असल्याचे सांगत बंदी कायम ठेवली. त्यामुळे आता नागपूरमध्ये नायलॉन मांजा वापरल्यास भादंविमधील कलम १८८ अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. 
-------------
जीवघेणा नायलॉन मांजा 
नायलॉन मांजा हा पारंपरिक मांजाच्या तुलनेत स्वस्त व अधिक मजबूत असल्यामुळे मागील काही वर्षांपासून नायलॉन मांजाची मागणी वाढली आहे. १०० रुपयांमध्ये नायलॉन मांजा चक्रीसह मिळतो तर पारंपरिक मांजाची विक्री २५० रुपयापासून सुरुवात होते. नायलॉन मांजा हा नायलॉन धाग्यापासून तयार करण्यात येत असून त्यावर रासायनिक प्रक्रिया करून अत्यंत मजबूत बनवला जातो. त्यामुळे नायलॉन मांजा सहसा तुटत नाही व काही वर्षे तसाच राहतो. नायलॉन मांजा नागरिकांच्या जीविताला व आरोग्याला धोका निर्माण करतो.