खालापूर : पर्यटकांनो, तुम्हाला कर्जत-खालापूरमध्ये वीकेंडला एन्जॉयसाठी यायचे असल्यास तुमचे स्वागत आहे, मात्र हे स्वागत हेल्दी एन्जॉयसाठी करण्यात येणार आहे जर तुम्ही अतिउत्साहीपणा केला तर तुमच्यावर पोलिसांची नजर असणार आहे. अतिउत्साह दाखविणाऱ्यांना थेट जेलची हवा खावी लागणार आहे. कर्जतच्या - खालापूरच्या धरण, तलावांमध्ये, धबधब्यांवर तुम्हाला जायचे असेल तर आता जमावबंदी म्हणजेच १४४ कलम लागू केला आहे. असे एक पत्रक प्रांताधिकारी दत्ता भडकवाड यांनी प्रसिद्ध केले आहे . रायगड जिल्ह्यातील कर्जत -खालापूरमध्ये तलाव, धबधब्यांवर मौजमजा करण्यासाठी आलेल्या पर्यटकांना आपल्या जीवाला मुकावे लागल्याच्या घटना ताज्या असताना तर शनिवार, रविवार कर्जतचा आशाणे धबधबा, पळसदरी धरण, सोलनपाडा तलाव अशा सर्वच ठिकाणी पर्यटकांची खूपच गर्दी होत असल्याने त्या गर्दीने स्थानिकांना त्रास होत आहे. वाहनांमुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. ज्या ठिकाणी पर्यटक एन्जॉय करतात त्याठिकाणी दारूच्या बाटल्यांसह इतर खाद्याच्या वस्तू सर्वत्र पडलेल्या असतात अशा सर्वच गोष्टींमुळे पर्यटकांचा एन्जॉय स्थानकांच्या मुळावर आल्याने तर घडणाऱ्या दुर्घटनांवर नियंत्रणासाठी कर्जतच्या प्रांताधिकाऱ्यांनी सोलनपाडा धरणासह सर्वच ठिकाणी आता कलम १४४ लागू केले असल्याचा आदेशच काढला आहे. पर्यटकांना बंदी मुळीच नाही मात्र काही दुर्घटना घडू नये यासाठी कर्जत प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. अतिउत्साही पर्यटकांना मात्र बंदी कायम आहे. त्यांच्यावर पोलिसांचे लक्ष राहणार असून अतिउत्साही पर्यटकांवर कारवाई होणार आहे, असे आदेश कर्जत उपविभागीय अधिकारी दत्ता भडकवाड यांनी दिले आहे.>आदेशातील नमूद बाबी धबधब्यांवर, तलावांवर मद्यपान करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक आणि अनधिकृत मद्यविक्री यावर पोलिसांची नजर असणार आहे. दरड कोसळणारे धोकादायक बनलेले धबधबे, तलावांवर सेल्फी काढणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.खोल पाण्यात उतरणे, वाहत्या पाण्यात जर तुम्ही उतरलात तर कारवाई होणार आहे. धबधब्याच्या वरती जर तुम्ही गेलात किंवा पडणाऱ्या धबधब्याखाली बसलात तर कारवाई होणार आहे .धबधब्याच्या वरती जर तुम्ही गेलात किंवा पडणाऱ्या धबधब्याखाली बसलात तर कारवाई होणार आहे .सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, प्लास्टिक, काचेच्या बॉटल फेकणे सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांकडून जर महिलांशी असभ्य वर्तन, छेडछाड, अश्लील हावभाव, शेरेबाजी करणाऱ्यांवर थेट पोलिसांकडून कारवाई. सार्वजनिक ठिकाणी पर्यटकांकडून डीजे लावणे, गाडीतील टेप वाजविणे असे केल्यास कारवाई होणार आहे.कर्जत-खालापूरमध्ये पर्यटकांना बंदी अजिबात नाही मात्र ज्या काही दुर्घटना घडल्या आहेत आणि अशा दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी तर पर्यटकांकडून मौज करताना अतिउत्साहीपणा करण्यात येत असताना त्याला जरब बसावी आणि येणाऱ्या पर्यटकांना हेल्दी पर्यटन करता यावे यासाठी १४४ कलम लागू करून काही कडक निर्बंध आदेश जारी केले आहेत. त्याचे पालन करून तुम्ही एन्जॉय करू शकता मात्र त्याचे जर उल्लंघन करण्यात आले तर त्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आले आहेत. - दत्ता भडकवाड, प्रांताधिकारी, कर्जत
खालापूरमध्ये अतिउत्साही पर्यटकांवर बंदी
By admin | Updated: July 23, 2016 03:02 IST