शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बालगुन्हेगारही लष्करी सेवेसाठी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2016 04:28 IST

बालगुन्हेगार म्हणून शिक्षा झाली असेल तरी अशी व्यक्ती प्रौढपणी भारतीय लष्करातील सेवेसाठी अपात्र ठरत नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला

मुंबई: एखाद्या व्यक्तीला अल्पवयीन असताना फौजदारी गुन्हयात दोषी ठरून बालगुन्हेगार म्हणून शिक्षा झाली असेल तरी अशी व्यक्ती प्रौढपणी भारतीय लष्करातील सेवेसाठी अपात्र ठरत नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील कांजळा गावातील कैलास संभाजी लोहकरे या अभियांत्रिकी पदविकाधारक तरुणाची लष्करात यांत्रिकी सैनिक म्हणून झालेली रीतसर निवड तो बालगुन्हेगार आहे या कारणावरून रद्द केली गेली होती. त्याविरुद्ध कैलासने केलेली याचिका मंजूर करताना न्या. संभाजी शिवाजी शिंदे व न्या. संगीतराव पाटील यांच्या औरंगाबाद येथील खंडपीठाने हा निकाल दिला.लष्कराच्या भरती अधिकाऱ्यांनी कैलासला बालगुन्हेगार म्हणून पूर्वी दोषी ठरविले होते हा मुद्दा बाजूला ठेवून त्याच्या पात्रतेचा अन्य निकषांवर निर्णय करावा व त्यात तो पात्र ठरत असेल तर आणखी विलंब न लावता सहा आठवड्यांत त्याला यांत्रिकी सैनिक म्हणून रुजू करून घ्यावे, असा आदेश खंडपीठाने दिला.पाच वर्षांपूर्वी उस्मानपूरा पोलिसांनी कैलाससह इतरांवर भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४ व ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला होता. त्यावेळी कैलास अल्पवयीन होता. त्यामुळे त्याचा खटला बालगुन्हेगारी न्यायालयाच्या दंडाधिकाऱ्यांपुढे गेला. तेथे कैलासने गुन्हा कबुल केल्यावर न्यायालयाने त्याला औपचारिकपणे दोषी ठरवून पुन्हा असा गुन्हा न करणयाची समज देऊन घरी जाऊ दिले होते.यानंतर कैलास शिकला व त्याने अभियांत्रिकी पदविका मिळविली. गेल्या वर्षीच्या जानेवारीत भारतीय लष्करातर्फे औरंगाबाद येथे खुली सैन्यभरती झाली त्यात कैलास सहभागी झाला.सर्व चाचण्या यशस्वीपणे उत्तीर्ण होऊन त्याची यांत्रिकी सैनिक म्हणून निवड झाली. नंतर मूळ कागदपत्रे सादर केली त्यात पोलिसांचा अहवालही होता व त्यात कैलासला बालगुन्हेगार म्हणून पूर्वी दोषी ठरविले गेल्याची नोंद होती. लष्करी अधिकाऱ्यांनी त्यावर बोट ठेवून कैलासला झालेली निवड रद्द करण्यात आल्याचे कळविले.लष्कराने आपल्या या निर्णयाचे समर्थन करताना असे सांगितले की, आमच्या भरती नियमांमध्ये कोणत्याही फौजदारी गुन्ह्यात दोषी ठरलेले असणे ही पूर्णपणे अपात्रता ठरविलेली आहे. मात्र हे फेटाळून लावताना न्यायालयाने म्हटले की,इतर कोणत्याही कायद्यांत काहीही म्हटलेले असले तरी बालगुन्हेगाराला झालेली शिक्षा ही त्याच्यादृष्टीने कोणतीही अपात्रता ठरणार नाही, अशी स्पष्ट तरतूद बालगुन्हेगारी कायद्यात आहे. हा संसदेने केलेला कायदा असल्याने लष्कराने केलेले प्रशासकीय नियम याहून वरचढ आणि विपरीत असू शकत नाहीत.या सुनावणीत याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. एस. जी. जाधवार यांनी, राज्य सरकारसाठी सहाय्यक सरकारी वकील ए.व्ही. देशमुख यांनी तर केंद्र सरकार व लष्करासाठी अ‍ॅड. डी.एल. नागोले यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)>दुसरी विनंती अमान्य : बालगुन्हेगारी कायद्याखाली चालणाऱ्या खटल्याचे रेकॉर्ड अपिल करण्याचा काळ लोटल्यानंतर नष्ट करण्याचीही त्या कायद्यात तरतूद आहे. प्रस्तूत प्रकरणात पोलिसांनी ते नष्ट केले नाही. तरी त्यांना ते नष्ट करण्याचा आदेश द्यावा, अशी कैलासही दुसरी विनंती होती. मात्र ती अमान्य करताना खंडपीठाने म्हटले की, त्या गुन्ह्यातील इतर गुन्हेगार अल्पवयीन नव्हते व त्यांच्यावरील खटला अद्याप सुरु असल्याने रेकॉर्ड नष्ट करता येणार नाही.