शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेबांनी केलेले उपकार गुजराती विसरले - संजय राऊत

By admin | Updated: October 26, 2014 14:32 IST

बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मुंबईत मोठ्या प्रमाणात गुजराती समाजावर अनेक उपकार केले. मात्र याचा गुजराती समाजाला विसर पडला अशी खंत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २६ -  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मुंबईत मोठ्या प्रमाणात गुजराती समाजावर अनेक उपकार केले. मात्र या उपकारांचा गुजराती समाजाला विसर पडला अशी खंत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नावानेच मतदान झाले व त्यामुळेच भाजपाला यश मिळाले अशी कबुलीही त्यांनी दिली आहे. 
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये संजय राऊत यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण केले आहे. यामध्ये राऊत म्हणतात, गुजराती समाज महाराष्ट्रात राहुनही जात व प्रांतासाठी गुजराती समाज शिवसेनेविरोधात गेला व भाजपाला मतदान केले. प्रचंड काम करुनही सुभाष देसाई, विनोद घोसाळक, पांडुरंग सपकाळ यांचा पराभवा हे याचेच लक्ष आहे. 
शिवसेना व भाजपा हे दोन्ही पक्ष एकत्र लढले असते तर किमान २०० जागांवर विजय मिळाला असता. मात्र दुर्दैवाने हे शक्य झाले नाही व शेवटी जनतेने दोघांनाही एकत्र या आणि सत्ता स्थापन करा या वळणावर आणून ठेवले. एमआयएममुळे भाजपाला फायदा झाला असेल. मात्र या नादात हिरवा विषारी साप विधानसभेत गेला. या निवडणुकीत एमआयएमचा उदय व मनसेचा अस्त झाला अशी मतही त्यांनी व्यक्त केले आहे. विदर्भातील नेत्याला मुख्यमंत्रीपद दिले तर विदर्भाचा विकास होईल असेही त्यांनी म्हटले आहे.