शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

बडोलेंना महाराष्ट्रातून हाकला - संभाजीराजे

By admin | Updated: October 15, 2016 17:37 IST

सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना महाराष्ट्रातूनच हाकलून देण्यात यावे, अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी कोल्हापुरात केली.

ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. १५ -  न्याय हक्क मिळविण्यासाठी मराठा समाजाचे राज्यभर मूकमोर्चे सुरू आहेत. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाच्या हक्काला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, ही मागणी या मोर्चातून करण्यात येत आहेत. परंतु, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी या मोर्चाबाबत केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. त्यामुळे मंत्री बडोले यांना महाराष्ट्रातूनच हाकलून देण्यात यावे, अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शनिवारी येथे केली.

(पैसेवाल्यांची आंदोलने यशस्वी होत आहेत, बडोले याचं खळबळजनक वक्तव्य)

 

खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, आक्रमक अशी मराठा समाजाची ओळख आहे तरीही, राज्यभर लाखोंच्या उपस्थितीत अत्यंत शिस्तबद्धपणे मराठा क्रांती मूकमोर्चे काढण्यात येत आहेत. याद्वारे मराठा समाजाने न्यायहक्कांच्या मागण्यांसाठीही काढण्यात येणाऱ्या संबंधित मोर्चाद्वारे एक आदर्श घालून दिला आहे. त्यातून मराठा समाजाने आपली एकजूट दाखवून दिली आहे. आतापर्यंत कोणतेही राजकीय नेतृत्व नसतानाही सकल मराठा समाज हेच नेतृत्व मानून मोर्चे यशस्वी झाले आहेत. इतर समाजासाठी हे आदर्शवत आहे. असे असताना मंत्री बडोले यांनी मराठा क्रांती मूकमोर्चाबाबत केलेले वक्तव्य साफ चुकीचे आहे. याबद्दल त्यांचा मी निषेध करतो शिवाय त्यांना महाराष्ट्रातून हाकलून द्यावे. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे. अ‍ॅट्रॉसिटीच्या कायद्यात सुधारणा व्हावी. इबीसी सवलतीसाठी उत्पन्नाची मर्यादा वाढवून सरकारने बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो.

(प्रतिनिधी)