शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

जात पडताळणीसाठी दीड कोटीची मागणी,बडोले यांचे चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 01:09 IST

जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी आपल्याकडे दीड कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट

विशेष प्रतिनिधी ।मुंबई : जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी आपल्याकडे दीड कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट शिवसेनेचे मेहकर (जि.बुलडाणा) येथील आमदार संजय रायमूलकर यांनी आज विधानसभेत केला. या प्रकरणी चौकशीचे आश्वासन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.जात पडताळणी प्रमाणपत्र मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत, नगरसेवकांची पदे रद्द होत आहेत. जात पडताळणीची लाखो प्रलंबित प्रकरणे आणि त्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी विधानासभेत लक्षवेधी सूचना मांडली. त्यावर झालेल्या चर्चेदरम्यान शिवसेनेचे किशोर पाटील यांनी जात पडताळणी समित्या गरिबांची लूट करत असून, ती रोखण्यासाठी कायदा करणार का? असा सवाल केला. या चर्चेदरम्यान जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी आपणाकडे दीड कोटी रुपये मागितले गेल्याचे शिवसेनेचे रायमुलकर यांनी सभागृहात सांगताच, सर्व सदस्यांनी संतापव्यक्त केला.रायमूलकर यांच्या जात प्रमाणपत्राचा वाद न्यायप्रविष्ठ आहे. काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करीत, आमदाराकडे दीड कोटी मागितले जातात ही गंभीर बाब असून, त्यावर मंत्र्यांनी उत्तर द्यायला हवे, अशी मागणी केली. त्यावर चौकशी करून कारवाई करू, असे आश्वासन बडोले यांनी दिले.वडिलांना प्रमाणपत्र नाहीवडिलांच्या प्रमाणपत्रावर मुलाला प्रमाणपत्र दिले जाते, पण मुलांकडे प्रमाणपत्र असताना वडिलांना दिले जात नसल्याचे भाजपाचे संजय सावकारे यांनी सांगितले. या प्रकरणी जबाबदार अधिकाºयांवर कारवाई करणार का? असा सवाल त्यांनी केला. यावर संबंधित प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून, मुलांच्या प्रमाणपत्राच्या आधारे वडिलांना प्रमाणपत्र देण्यासाठी येत्या दोन महिन्यांत कार्यवाही केली जाईल, असे सामाजिक न्यायमंत्र्यांनी सांगितले.कोल्हापूरचे आमदार आक्रमककोल्हापूरच्या पाच नगरसेवकांचे जात पडताळणी प्रमाणपत्राअभावी नगरसेवकपद रद्द होण्याची वेळ आली आहे. या मुद्द्यावर शिवसेनेचे प्रकाश आबिटकर, उल्हास पाटील आक्रमक झाले. संतप्त झालेले आबिटकर हे वेलमध्ये उतरले. शिवसेनेचे उल्हास पाटील यांनी जात प्रमाणपत्र समितीतील पोलीस अधिकारी निलंबित झाले आहेत. असंख्य प्रकरणे प्रलंबित आहेत, याकडे लक्ष वेधले. तेव्हा आठ दिवसांत सर्व प्रलंबित प्रमाणपत्रे दिली जातील, असे मंत्री बडोले यांनी सांगितले.समित्यांना अध्यक्षच नाहीत-राज्यामध्ये ३६ जात पडताळणी समित्या आहेत. मात्र, त्यावर बहुतांश समित्यांवर अध्यक्षाची नेमणूकच नसल्याचे अजित पवार यांनी, या वेळी सभागृहाच्या निदशर्नास आणून दिले. नागरिकांना वेळेवर प्रमाणपत्र मिळत नाही, हे सरकारचे अपयश आहे, असा आरोप पवार यांनी केला. यावर उत्तर देताना सामाजिक न्यायमंत्री बडोले यांनी उस्मानाबादमध्ये जात पडताळणीची १०७७ प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती दिली. निवडणुकीसंदर्भात काही त्रुटीची प्रकरणे असतात. त्यामुळे प्रमाणपत्र देण्यास विलंब होतो. प्रलंबित प्रकरणे पुढील आठ दिवसांत निकालात काढू, असे आश्वासन बडोले यांनी दिले.