शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरित पक्ष्यांनी फिरविली विदर्भाकडे पाठ

By admin | Updated: December 25, 2015 03:13 IST

संख्या रोडावली, थंडीअभावी स्थलांतराला उशीर

वाशिम: दरवर्षी विदर्भातील विविध धरणांवर तसेच अभयारण्यांमध्ये विदेशातून हजारो स्थलांतरित पक्षी येतात; मात्र यावर्षी विदर्भात पुरेशी थंडीच पडली नसल्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांनी पाठ फिरविली असल्याचे पक्षिमित्रांच्या निदर्शनास आले आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी अत्यंत कमी पक्षी येथे आल्याचे पक्षिमित्रांच्या निदर्शनास आले आहे. उत्तर ध्रुवावरील देशांमध्ये बाराही महिने थंड वातावरण असते. या देशांमध्ये अनेक प्रजातींचे पक्षी वास्तव्य करतात. हिवाळ्यात या भागात बर्फवृष्टी होते व सर्व जमीन बर्फाने आच्छादली जाते. त्यामुळे पक्ष्यांना अन्न मिळत नाही. त्यामुळे हे पक्षी हिवाळ्यात उष्ण क टिबंधीय प्रांताकडे स्थलांतर करतात. त्यापैकी काही पक्षी विदर्भात येतात. हिवाळ्यात या भागात थंडी असल्यामुळे त्यांना अनुकूल अधिवास मिळतो. यादरम्यान येथील तळ्यांवर पाणी असते, सर्वत्र निसर्ग बहरलेला असतो. पाणपक्षी व जंगलात राहणार्‍या पक्ष्यांना मुबलक अन्न उपलब्ध असते. चार महिने वास्तव्य केल्यानंतर हे पक्षी परत जातात. विदर्भात दरवर्षी युरोप, मंगोलिया, सायबेरिया या देशातून पक्षी स्थलांतर करतात. यामध्ये प्रामुख्याने बारहेडेड बूथ, शॉवेलर, पिन्टेल, टफ्टेड डक, कॉमन पोचार्ड या पक्ष्यांचा समावेश आहे. जवळपास ७0 ते ८0 प्रजातींचे पक्षी स्थलांतर करून विदर्भात येतात. यावर्षी मात्र विदर्भात डिसेंबर महिन्याचा अखेरचा आठवडा सुरू झाला तरी थंडी पडली नाही. तापमानात अजूनही म्हणावी तशी घट आली नाही. थंडी पडण्याला उशीर होत असल्यामुळे पक्ष्यांच्या स्थलांतरालाही उशीर होत असून, कमी पर्जन्यमानामुळे विदर्भातील जलसाठय़ात कमालीची घट झाली आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा कमी पक्षी आल्याचे पक्षिमित्र तथा वत्सगुल्म जैवविविधता संवर्धन समितीचे मिलिंद सावदेकर यांच्यासह पक्षिमित्रांच्या निदर्शनास आले आहे. या संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ही बाब निदर्शनास आली आहे. दरवर्षी वाशिम जिल्हय़ातील एकबुर्जी तलावावर समुद्र किनारी राहणारे फ्लेमिंगो पक्षी स्थलांतर करून येथे पंधरा दिवस वास्तव्य करीत असतात. फ्लेमिंगो हे दुर्मीळ पक्षी असून, सहसा आढळत नाहीत. गतवर्षी जिल्हय़ातील एकबुर्जी तलावावर १५६ फ्लेमिंगो पक्ष्यांची नोंद करण्यात आली होती. यावर्षी मात्र केवळ आठच पक्षी निदर्शनास पडले आहेत. त्यामुळे पक्ष्यांच्या स्थलांतरावर वातावरणाचा परिणाम झाल्याचे जाणवत आहे. विदर्भाच्या पक्षीवैभवासाठी ही धोक्याची घंटा समजली जात आहे.