शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लष्करामुळेच पुण्यात परतलो

By admin | Updated: April 30, 2015 00:19 IST

नेपाळच्या महाप्रलयकारी भूकंपाच्या ताडाख्यात सापडलेले पुण्यातील १६ पर्यटक बुधवारी सकाळी ११.३० च्या सुमारास सुखरुप परतले आहेत.

पुणे : नेपाळच्या महाप्रलयकारी भूकंपाच्या ताडाख्यात सापडलेले पुण्यातील १६ पर्यटक बुधवारी सकाळी ११.३० च्या सुमारास सुखरुप परतले आहेत. भारतीय लष्कर व नेपाळ पोलिसांच्या मदतीमुळे आमचा पुर्नजन्म झाला असून, त्यांच्या सहकार्यामुळे आम्ही पुण्यात सुखरुप परतलो, असे प्रमोद झगडे यांनी सांगितले.हडपसर येथील शुभांगी झगडे, प्रमोद झगडे, त्याचा मुलगा यांच्यासह सुमारे १६ लोक नेपाळला पर्यटनासाठी गेले होते. याबाबत झगडे यांनी सांगितले, नेपाळ येथील नामजी बाझार येथे खरेदी करत असतानाचा अचानक जमीन हलत असल्याचे जाणवले. सुरुवातील आपल्यालाच चक्कर येते की काय असे वाटले. मात्र, त्याच वेळी सर्वत्र गोंधळ आणि आरडाओरड सुरूझाला. आमच्या समोरच काही इमारती कोसळत होत्या. तेव्हा सर्वांच्या लक्षात आले येथे मोठा भूकंप झाला आहे. भूकंपाच्या जोरदार झटक्याने पायाखालची जमीन दुभंगते की काय, याची प्रचंड भीती वाटत होती. जीव मुठीत घेऊन सर्वांनी सुरक्षित जागी असरा घेतला. येथील नेपाळ पोलिसांनी सर्वांनाच चांगला आधार दिला. त्यानंतर एक दिवसांनी भारतीय आर्मीच्या मदतीने आम्ही काठमांडूला पोहचलो. येथे विमानतळावर भारतात येणाऱ्या नागरिकांची प्रचंड संख्या होती. अखेर आमचा नंबर आला आणि बुधवारी सकाळी ११.३० वाजता आम्ही सुखरुप पुण्यात परतलो. (प्रतिनिधी)