शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांच्या जयंती कार्यक्रमात रंगला न्यायाधीश नियुक्तीचा वाद

By admin | Updated: April 14, 2017 02:22 IST

उच्च न्यायालय व इतर न्यायालयांतील न्यायाधीश, न्यामूर्तींची नियुक्ती करताना भ्रष्टाचार होत असल्याचे मत मॅट बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. गुणरतन सदावर्ते यांनी डॉ. बाबासाहेब

मुंबई : उच्च न्यायालय व इतर न्यायालयांतील न्यायाधीश, न्यामूर्तींची नियुक्ती करताना भ्रष्टाचार होत असल्याचे मत मॅट बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. गुणरतन सदावर्ते यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. अ‍ॅड. मोहन पाटील यांनी हा मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न केल्यामुळे हा वाद रंगला. अ‍ॅड. गुणरतन सदावर्ते या कार्यक्रमात म्हणाले, न्यायाधीश आणि न्यायामूर्तींच्या निवडीत भ्रष्टाचाराचे आरोप वारंवार होत आहेत. या आरोपांवर तर्कवितर्कही लढवले जातात. मात्र, हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी ठोस पावले उचलली जात नाहीत. यापुढे अशा प्रकारचे आरोप होता कामा नयेत, याची काळजी घेण्याची गरज आहे. डॉ. आंबेडकर यांचा १२६वा जयंती उत्सव सोहळा मॅटतर्फे गुरुवारी साजरा करण्यात आला. यानिमित्त ‘राष्ट्रीय एकात्मता’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला मॅटचे अध्यक्ष निवृत्त न्या. अंबादास जोशी, आर. व्ही. मलिक आदी उपस्थित होते. मुंबई उच्च न्यायालयातील न्या. रणजीत मोरे व न्या. आर. एम. सावंत यांच्या नियुक्तीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप यापूर्वी झाला आहे. असे आरोप होऊ नयेत, याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे अ‍ॅड. सदावर्ते म्हणाले. त्यांचे भाषण थांबवत अ‍ॅड. मोहन पाटील म्हणाले की, तुम्ही विशिष्ट समाजाच्या न्यायमूर्तींचा उल्लेख भाषणात केला. त्यांच्या या आक्रमकतेमुळे तणाव निर्माण झाला. मुख्य सरकारी वकील राज पुरोहित, अ‍ॅड. अरविंद बांदिवडेकर व इतरांनी मध्यस्ती करत प्रकरण शांत केले. त्यानंतर, न्यायपालिकेत सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अजय खानविलकर, निवृत्त न्या. अंबादास जोशी यांसारखे कर्तव्यदक्ष न्यायामूर्ती असून त्यांनी अनेक महत्त्वाचे निकाल दिले आहेत. अशी न्यायव्यवस्था भ्रष्टाचारमुक्त ठेवणे, सर्वांची जबाबदारी असल्याचे अ‍ॅड. सदावर्ते म्हणाले. (प्रतिनिधी)