शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

अजब! देशातील पहिलाच टिकाव आणि फावड्याचा विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2017 21:20 IST

देशातील पहिला दोन निर्जीव वस्तूंचा विवाह सोहळा साजरा झाला. यामध्ये विजयीभव (टिकावराव) श्रीमंत पाणीदार जलसंधारण, कळसकर यांचे ज्येष्ठ सुपुत्र

ऑनलाइन लोकमत
कळस(पुणे), दि. 23 - कळस (ता. इंदापूर) येथे सोमवारी (दि. २२)  देशातील पहिला दोन निर्जीव वस्तूंचा विवाह सोहळा साजरा झाला. यामध्ये  विजयीभव (टिकावराव) श्रीमंत पाणीदार जलसंधारण, कळसकर यांचे ज्येष्ठ सुपुत्र  (ता. इंदापूर, जिल्हा पुणे) व भुवजचुंडेमंडीत (फावडेताई) श्रीमंत सुजलाम सुफलाम निरगुडेकर (रा. निरगुडे, ता. इंदापूर, जिल्हा पुणे) यांची ज्येष्ठ कन्या, हा देशातील आगळावेगळा ‘पाणी फाउंडेशन’ सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा- २०१७ श्रमदान लग्नसोहळा आज दोन्ही  गावांच्या मान्यवरांच्या उपस्थित मोठ्या थाटामाटात सायंकाळी झाला.
 
या वेळी दोन्ही गावचे वºहाडी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी आहेर म्हणून झाडांच्या बिया व रोपे स्वीकारण्यात आली. हा लग्न समारंभ येथील गुरवाचा ओढा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. येथे मागील ४५ दिवसांपासून सुरू असलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस होता. पाणी फाउंडेशनची स्पर्धा सुरू झाल्यापासून लोकांचा सहभाग कमी असल्याने अपेक्षित काम  झाले  नाही. त्यामुळे कळसकर  आणि निरगुडे या दोन गावांमध्ये एका टिकावापासून व एका फावड्यापासून सुरू झालेले काम भविष्यात श्रमदान, जलश्रमदान ही लोकचळवळ निर्माण व्हावी. म्हणून कळस येथे आगळा आणि वेगळा विवाह सोहळ्याचा कार्यक्रम झाला. या लग्नसोहळ्याच्या लग्नपत्रिकाही वाटण्यात आल्या होत्या.  तसेच ब्राह्मण, विधिवत पूजा, अक्षदा, मंगलाष्टका, पाण्याची व जेवणाची सोय देखील करण्यात आली होती. लग्नसमारंभासाठी विविध गावांतील  जनसमुदाय जमा झाला होता.
 
डॉ. पोळ यांच्यामुळे प्रेरणा... 
वास्तविक कळस गाव जलसंधारण कामासाठी  एकत्र यायला तयार नव्हते. पण यासाठी पाणी फाउंडेशनचे राज्य समन्वयक डॉ. अविनाश पोळ यांच्या मार्गदर्शनानंतर काही प्रमाणात तरुण एकत्र येऊन त्यांनी गावाचे चित्र बदलवले. इंदापूर तालुक्यात  हा एक अनोखा विवाहसोहळा पार पडला. निमित्त होते सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या अखेरच्या दिवसाचे. या स्पर्धेत इंदापूर तालुक्यातील २२ गावांचा समावेश होता. अनेक गावे वेगवेगळ्या पद्धतीने श्रमदान करत होते. तालुक्यातील कळस व निरगुडे या दोन्ही गावांनी मात्र एक अनोखी शक्कल लढवली. श्रमदानात महत्त्वाचे हत्यार असलेले टिकाव व फावडे (खोरे) यांचं लग्न लावून अनोख्या पद्धतीनं त्यांनी श्रमदान केलं.
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी या लग्नाची तारीख ठरवली गेली. कळसगावचा टिकावराव तर निरगुडेगावची फावडेताई. लग्न जरी या निर्जीव वस्तूंचे असले तरी खºयाखुºया लग्नासारखे लग्न लावण्यात आले. पत्रिका काढण्यात आल्या. लग्नाच्या अगोदरच्या दिवशी नवरा व नवरीला हळद लावण्यात आली. हळदी समारंभ मोठ्या धूमधडाक्यात करण्यात आला. लग्नाच्या दिवशी नवरदेवाच्या गावी म्हणजेच कळसला लग्नाची तयारी केली होती. 
 पुढच्या वर्षी करणार टिकावराव-फावडेताईचा सामुदायिक विवाह... 
एक टिकाव व एक फावडे एकत्र आणले तर मोठ्या प्रमाणात काम होईल. आगामी काळात त्यांची संख्या  ५० झाली तर पूर्ण गाव दुष्काळमुक्त व टँकरमुक्त होईल. त्यामुळे पुढच्या वर्षीदेखील यांचा सामुदायिक विवाह सोहळा करण्याचा निरगुडे व कळस गावाचा मनोदय आहे. कळस व निरगुडे या गावात श्रमदान व यांत्रिकीकरणाचे काम दुष्काळमुक्तीसाठी टाकलेले एक पाऊल. हा विवाह सोहळ्यातून एक संदेश देण्यात आला. सामाजिक विकासासाठी चळवळीचे रूपांतर लोकचळवळीत होण्यासाठी काही कालावधीची गरज असते. या चळवळीत स्वार्थी माणसे आली, की चळवळ नामशेष होते. नि:स्वार्थी माणसे एकत्र आली, की चळवळ हळूहळू जोमात वाढते. कळस व  निरगुडे या गावांना स्पर्धेचा ४५ दिवसांचा कालावधी काही प्रमाणात काम पण लोक एकत्र आणण्यात गेला. अखेरीस लोक एकत्र आले. जलसंधारण कामासाठी वापरले जाणारे साहित्य म्हणजे टिकाव  व  फावडे यांचा लग्नसमारंभ करून पुढील काळासाठी संसार थाटला आहे. त्यामुळेच भविष्यात या गावांची कामे संपूर्ण देशाला दिशादर्शक असतील व सातत्यपूर्ण श्रमदानातून ही गावे पुढच्या वर्षीच दुष्काळावर मात करतील.