शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

अमली पदार्थविरोधी दिनानिमित्त जागृती

By admin | Updated: June 27, 2016 02:32 IST

अमली पदार्थविरोधी दिनानिमित्ताने कल्याण- डोंबिवलीत शनिवारी जनजागृती मोहीम राबवण्यात आली.

कल्याण : अमली पदार्थविरोधी दिनानिमित्ताने कल्याण- डोंबिवलीत शनिवारी जनजागृती मोहीम राबवण्यात आली. डोंबिवलीत रामनगर, मानपाडा पोलीस आणि ईगल ब्रिगेड यांच्या वतीने लोढा हेवन परिसरातील रामभाऊ भिसे बालविकास मंदिर महाविद्यालयात जनजागृती करण्यात आली. तर, कल्याणमध्ये पोलीस उपायुक्त कार्यालय परिसरात फलकाच्या माध्यमातून जनजागृती केली. लोढा हेवनमध्ये झालेल्या कार्यक्रमात डोंबिवलीचे सहायक पोलीस आयुक्त सूर्यकांत घाटगे यांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ध्वनिफ ीत-चित्रफितीद्वारे तसेच विविध पोस्टर, बॅनर्सच्या माध्यमातून संदेश देताना त्यांनी मुलांशी संवाद साधला. बाजारात उपलब्ध असलेल्या अमली पदार्थांची ओळख करून देत त्यांनी त्याच्या दुष्परिणामांची माहिती दिली. ईगल ब्रिगेडचे संस्थापक विश्वनाथ बिवलकर यांनी पालकांना मुलांच्या हालचालींवर तसेच त्यांच्या मित्रांच्या संगतीवर लक्ष ठेवून त्यांना यापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले. या वेळी शाळेच्या संचालिका सुलभा कांबळे यांनीही मार्गदर्शन केले. पथनाट्यांतूनही अमली पदार्थ सेवनाचा विषय मांडण्यात आला. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोड शो झाला. याला भरपावसातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात ब्रिगेडच्या दामिनी पथकातील तेजस्विनी कापडणे, अरुणा बेंद्रे, सुनीता शिंदे, जया सुब्रह्मण्यम, रेखा मेनन, गौरी पांचाळ, नीता गवस, विजया शिरोडकर, प्रज्ञा पेडणेकर, सुप्रिया दुस्तकर, नितेश चांदसकर यांचा तसेच ईगल ब्रिगेड पोलीसमित्र सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)