शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात अवतरले शिवराज्य

By admin | Updated: February 19, 2017 13:46 IST

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने काढण्यात आलेल्या भव्य दिव्य मिरवणुकीने शहरवासीयांच्या

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 19 : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने काढण्यात आलेल्या  भव्य दिव्य मिरवणुकीने शहरवासीयांच्या डोळ््यांचे पारणे फिटले.  शिवराज्य कारभाराचे दर्शन घडविणाऱ्या चित्ररथांच्या माध्यमातून शहरात जणू शिवराज्यच  अवतरले होते. अत्यंत शिस्तबद्ध व पारंपरिक पध्दतीच्या

नृत्य, लेझीम पथकांचा तसेच सर्व जाती धर्माचा, पक्षांचा, संस्थांचा समावेश हे  मिरवणुकीचे वैशिष्ट ठरले. बदलत्या सामाजिक परिस्थितीत धार्मिक आणि जातीय सलोखा काळाची गरज बनली आहे. त्या अनुषंगाने  शिवजयंती निमित्त सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन अनोखा सलोखा जपण्याचा संकल्प सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने करण्यात आला होता. त्यानुसार या उत्सवाला रविवारी सकाळी छत्रपती श्री शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलापासून सुरूवात झाली. या ठिकाणी माजी मंत्री सुरेशदादा जैन, आमदार सुरेश भोळे,  महापौर नितीन लढ्ढा, मनपा आयुक्त जीवन सोनवणे, सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, माजी महापौर विष्णू भंगाळे, माजी उपमहापौर करीम सालार, नगरसेवक नरेंद्र पाटील, प्रा. डी.डी. बच्छाव, अ‍ॅड. विजय भास्कर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक, मराठा सेवा संघाचे केंद्रीय समिती सदस्य सुरेंद्र पाटील, डॉ. प्रताप जाधव, नगरसेवक कैलास सोनवणे, डॉ. राधेश्याम चौधरी, शंभू पाटील, गजानन मालपुरे, फारुक शेख, शिवाजीराव भोईटे, गिरीश कुळकर्णी, प्रा. सुनील गरूड, बबलू तडवी आदी उपस्थित होते. मान्यवरांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ््याचे पूजन करण्यात येऊन भव्य मिरवणुकीस प्रारंभ झाला. 

माता जिजाऊ, शिवबांचे दर्शन....अग्रभागी शिवरायांचा अर्धाकृती पुतळा उघड्या जीपमध्ये ठेवण्यात आला होता. याच जीपवर लावण्यात आलेले छत्रपतींची आकर्षक प्रतिमा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. या जीपमागे माता जिजाऊ, छत्रपती शिवराय आसनस्थ असलेले घोडे, उंट व त्यांच्या मागे मावळे, भालेदार पठाण असा सजीव देखावा साकारण्यात आला होता.  

छत्रपतींच्या पुतळ््यास पुष्पहार अर्पणमिरवणुकीदरम्यान शिवतीर्थ मैदानानजीक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ््यास महापौर नितीन लढ्ढा व मनपा आयुक्त जीवन सोनवणे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन मिरवणूक पुढे मार्गस्थ झाली. 

मान्यवरही पायी सहभागीया भव्य मिरवणुकीत माजी मंत्री सुरेशदादा जैन हे नेहरु चौकापर्यंत पायी सहभागी झाले होते तर इतर मान्यवर मिरवणुकीच्या शेवटपर्यंत पायीच सहभागी झाले होते. 

आगळी वेगळी संकल्पनाशिवजयंतीची सुरूवातीपासूनच वेगळी संकल्पना ठेवण्यात आली होती. यामध्ये रयतेचा राजा, महिलांचा रक्षणकर्ता, शेतकऱ्यांचा कैवारी, कुळवाडी भूषण राजा अशी संकल्पना यंदा ठेवण्यात आली व त्याचे प्रतिबिंब या मिरवणूकीत दिसून आले. सोबतच संत, राष्ट्रीय पुरुषांचे छायाचित्र चित्ररथांवरून झळकत होते. 

जयघोषाने दणाणले शहरया मिरवणूकीसह शहरात सकाळपासूनच वेगवेगळ््या भागात शिवरायांचा तसेच माता जिजाऊ यांचा जयजयकार करण्यात येत होता. या जयघोषाने शहर दणाणले होते. शहरातील विविध रस्त्यांवर दुचाकीस्वार तरुण हाती भगवा ध्वज घेत छत्रपतींचा जयजयकार करीत प्रचंड उत्साह दिसून येत होता. 

महिलांचा लक्षणीय सहभाग... मिरवणुकीत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. वेगवेगळ््या माध्यमाच्या विविध शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थिनीदेखील मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे महिला, तरुणींनी भगवे फेटे परिधान केले होते. 

केळी, सरबत, पाणी वाटप मिरवणुकीदरम्यान विविध संस्थांच्यावतीने केळी, सरबत व पाण्याचे पाऊच वाटप करण्यात आले.  अरे माझा शिवबा जन्मलाशिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला... , सनई-चौघडे वाजू लागले..., सारे आनंदी-आनंदी वातावरण पसरले...,भगवा अभिमानाने फडकू लागला..., सह्याद्री आकाशाच्या उंचीने दिल्लीकडे ताठ नजरेने पाहू लागली..., अवघा दक्खन मंगलमय झाला.., अन एक आरोळी सह्याद्रीच्या कडेकोपर्यात घुमली.... ह्यअरे माझा राजा जन्मला..., माझा शिवबा जन्मला ..., दीन-दलितांचा कैवारी जन्माला..., दृष्टांचा संहारी जन्मला..., अरे माझा राजा जन्मला...ह्ण  या ओळींची आठवण करून देणारा प्रसंगच जळगाव शहरात या भव्य-दिव्य मिरवणुकीने उभा केला होता. <