शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळ विस्तारात कलंकित सदस्यांचा समावेश टाळा! - विखे पाटील

By admin | Updated: July 7, 2016 19:34 IST

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कलंकित सदस्यांचा समावेश टाळावा

ऑनलाइन लोकमतशिर्डी, दि.७  - राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कलंकित सदस्यांचा समावेश टाळावा; अन्यथा विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सरकारला तीव्र रोषाला तोंड द्यावे लागेल, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना सरकारच्या संभाव्य विस्ताराबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील यांनी सांगितले की, सार्वजनिक पैशाचा अपहार आणि जनतेची फसवणूक केल्याचे गंभीर आरोप असलेल्या काही आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता असल्याची माहिती प्रसारमाध्यमांमधून समोर आली आहे. मुळातच मंत्रिमंडळातील निम्म्या सदस्यांवर आर्थिक व नैतिक भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. यासंदर्भात वारंवार दाद मागितल्यानंतरही सरकारने संबंधित मंत्र्यांचे राजीनामे घेतले नाहीत. त्यामुळे सरकारने कलंकित मंत्र्यांच्या यादीत आणखी भर घालून महाराष्ट्रातील जनतेची अधिक फसवणूक करू नये, असा इशारा विरोधी पक्षनेत्यांनी दिला.मागील दीड वर्षात राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे वाजलेले तीन-तेरा आणि शेतकऱ्यांची झालेली दयनीय अवस्था पाहता या विस्तारात महाराष्ट्राला पूर्णवेळ गृह मंत्री आणि पूर्णवेळ कृषि मंत्री द्यावेत, अशीही मागणी विखे पाटील यांनी केली आहे.