शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

आव्हाड आले, स्पष्टीकरणही दिले

By admin | Updated: December 22, 2015 02:34 IST

ठाण्यातील डेव्हलपर्स सूरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणात राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांचे नाव आल्यानंतर प्रकरण बरेच गाजले.

नागपूर : ठाण्यातील डेव्हलपर्स सूरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणात राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांचे नाव आल्यानंतर प्रकरण बरेच गाजले. विधानसभेतही या प्रकरणाचा उल्लेख झाला. अधिवेशनाचे दोन आठवडे अनुपस्थित राहिलेले आव्हाड सोमवारी सभागृहात आले व त्यांनी आपले स्पष्टीकरणही दिले. नजीब मुल्ला यांच्या खात्यावरून आपल्या खात्यात रक्कम जमा झालीच नाही, असा दावा करीत आयकर परतावा व भागीदारी कराराशी संबंधित कागदपत्रे विधानसभा अध्यक्षांकडे सोपविली. दोन आठवडे अनुपस्थित असलेले आव्हाड आज विधिमंडळ परिसरात दिसताच सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे लागल्या होत्या. विधानसभेत दिवसभराच्या कामकाजात भाग घेतल्यानंतर आव्हाड यांनी या विषयावर सभागृहात आपले स्पष्टीकरण दिले. आव्हाड म्हणाले, १५ डिसेंबर २०१५ रोजी एका लक्षवेधीवरील चर्चेदरम्यान नजीब मुल्ला यांच्या खात्यातून माझ्या खात्यावर काही रक्कम ट्रान्सफर झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ही माहिती चुकीची आहे. नजीब मुल्ला, मिलिंद पाटील, विशाल पाटील व मी अशा चौघांनी मिळून ड्रीम होम रिएल्टर्स नावाची बांधकाम क्षेत्रातील कंपनी सन २००८मध्ये स्थापन केली. सन २०१०पासून आयकर खात्याला कराच्या स्वरूपात त्याची माहिती देण्यास सुरुवात केली. सदर कंपनीच्या माध्यमातून २०१४-१५च्या आयकर विभागाला देण्यात आलेल्या अधिकृत माहितीमध्ये प्रत्येकी १ कोटी ७ लाख रुपये आम्हा भागीदारांच्या नावावर मेहनताना दाखविण्यात आलेला आहे. असाच मेहनताना सन २०१०-११, २०११-१२, २०१२-१३ व २०१३-१४मध्ये प्रत्येक भागीदाराच्या नावावर दाखविण्यात आलेला आहे. सदरचा नफा आजपर्यंत त्या कंपनीकडून माझ्या खात्यात आलेला नाही. त्यामुळे ती रक्कम नजीब मुल्ला यांच्या खात्यावरून माझ्या खात्यावर जमा झाली, असा अर्थ निघू शकत नाही, असे त्यांनी अध्यक्षांना सांगितले.