शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

पावसाने गाठली २ महिन्यांची सरासरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2016 00:27 IST

जून महिना कोरडा गेल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांवर वरुणराजाने जुलैै महिन्यात कृपादृष्टी दाखवीत दोन्ही महिन्यांची सरासरी गाठली आहे

पुणे : जून महिना कोरडा गेल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांवर वरुणराजाने जुलैै महिन्यात कृपादृष्टी दाखवीत दोन्ही महिन्यांची सरासरी गाठली आहे. जिल्ह्यात आजअखेर एकूण ५६१४.५ मिमी एवढा पाऊस झाला असून, तो सरासरी ४३१ मिमी इतका आहे. गेल्या आठ दिवसांपासून उघडीप सुरू असल्याने पेरण्यांनी वेग घेतला आहे. जुलै महिन्याच्या १९ दिवसांत सरासरी ३५0 मिमी पाऊस पडला आहे. गेली आठ दिवस तो अधूनमधून जोर धरत असल्याने पेरण्यांना वेग आला आहे. गेल्या आठवड्यात १३ जुलैैपर्यंत सुमारे ६७ हजार क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. त्या टक्केवारीत २९ टक्के इतक्या होत्या. आता आठवडाभर उघडीप सुरू असल्याने पेरण्या ६0 ते ७0 टक्केपर्यंत गेल्याची शक्यता आहे. भातशेतीला हा पाऊस अत्यंत उपयुक्त असून, सर्वत्र पाणीच पाणी झाले असून शेतकरी भातलावणीत व्यस्त आहेत. जून व जुलै महिन्यात पुण्यात सरासरी ४३८.१ मिमी पाऊस पडतो. मात्र यंदा नैर्ऋत्य मोसमी पावसाने (मॉन्सून) देशात आणि महाराष्ट्रातही उशिरा आगमन केले. त्यामुळे तो उशिरा दाखल झाला. जून महिन्याचा शेवटचा आठवडा वगळता संपूर्ण महिना कोरडा गेला. जून महिन्यात शहरात ८१.३६ मिमी पाऊस झाल्याने पेरण्याही रखडल्या. जुलै महिना पाऊस घेऊन आला. आतापर्यंत जिल्ह्यात ५६१४.५ मिमी एवढा पाऊस झाला आहे. जून महिन्याचा बॅकलॉग पावसाने आता भरून काढला आहे.