शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

वृक्षसंवर्धनासाठी झटतोय अवलिया!

By admin | Updated: December 6, 2015 02:33 IST

वृक्षारोपणानेच पर्यावरणाचा ढासळलेला समतोल साधला जाऊ शकतो, या विचाराने एक अवलिया वृक्षसंवर्धनासाठी अकोला जिल्ह्यात झटत आहे. त्याने गेल्या सात महिन्यांत

- अतुल जयस्वाल,  अकोलावृक्षारोपणानेच पर्यावरणाचा ढासळलेला समतोल साधला जाऊ शकतो, या विचाराने एक अवलिया वृक्षसंवर्धनासाठी अकोला जिल्ह्यात झटत आहे. त्याने गेल्या सात महिन्यांत स्थानिकांच्या मदतीने जिल्ह्यात तब्बल ५ हजार झाडे लावली असून, पुढील काही काळात १५ हजारांपेक्षा जास्त झाडे लावण्याचा संकल्प त्याने सोडला आहे.तामिळनाडू राज्याच्या रामनाथपुरम् जिल्ह्यातील हरियानकोटई या छोट्याशा गावातून आलेल्या ए.एस. नाथन यानेया कार्यासाठी स्वत:ला वाहून घेतले आहे. शासनाकडून होत असलेल्या वृक्षारोपण मोहिमेत जोपर्यंत स्थानिकांचा सक्रिय सहभाग लाभत नाही, तोपर्यंत ती मोहीम व्यर्थ ठरते, ही वस्तुस्थिती हेरून नाथनने जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदरसिंह यांची भेट घेऊन त्यांना आपली योजना सांगितली. या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील अधिकाऱ्यांना नाथनला वृक्षसंवर्धनात मदत करण्यास सांगितले.त्यानुसार नाथनने आतापर्यंत तेल्हारा, बार्शीटाकळी, आकोटव मूर्तिजापूर या चार तालुक्यांमध्ये ५ हजार झाडे स्थानिकांच्यामदतीने लावली आहेत. अकोला, बाळापूर व पातूर या तीन तालुक्यांमध्ये आणखी १० हजार झाडे लावण्याचा त्याचा मानस आहे. वृक्षारोपण कायदा सक्तीचा व्हावादेशात वृक्षारोपण सक्तीचे करणारा कायदा व्हावा, यासाठी तो जनजागृती करीत आहे. वृक्षारोपण केल्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय देशात कुणालाही कोणत्याही प्रकारची सरकारी प्रमाणपत्रे मिळू नयेत, असा कायदाच देशात पारित करायला हवा, असे नाथनचे मत आहे.सात वर्षांपूर्वी नाथन मुंबईत आला. त्याने वृक्षसंवर्धनाचे काम सुरू केले. या वर्षी २७ फेब्रुवारी रोजी नागपूर येथे निरी या संस्थेच्या कार्यक्रमात ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांच्याशी त्याची भेट झाली. डॉ. भटकरांनी नाथनला अकोला जिल्ह्यात काम करण्याचे सुचविले. त्यानुसार नाथन मार्च महिन्यात मूर्तिजापूर येथे आला व त्याने येथे वृक्षसंगोपनाचे कार्य सुरू केले. प्रत्येक झाडाला ‘ट्री कोड’- वृक्षारोपण मोहीम राबविण्याआधी नाथन त्यामध्ये सहभागी होणाऱ्यांकडून एक अर्ज भरून घेतो. त्यामध्ये नाव, आधार क्रमांक अशी वैयक्तिक माहिती व तो जे झाड लावणार, त्याचा क्रमांक नमूद असतो. - अशा प्रकारे त्या व्यक्तीला त्या झाडाशी ‘लिंक-अप’ केले जाते. त्यानंतर त्या झाडाच्या संगोपनाची जबाबदारी संबंधित व्यक्तीकडे देण्यात येते.