शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद दरोड्याचा ठाण्यात लागला छडा

By admin | Updated: January 12, 2015 03:20 IST

नववर्षाच्या सुरुवातीलाच औरंगाबादच्या वाळुंज एमआयडीसी परिसरात तांबे आणि अ‍ॅल्युमिनियमचा ४ लाखांचा ऐवज लुटणा-या चौघांना ठाणे पोलिसांनी अटक केली

जितेंद्र कालेकर, ठाणेनववर्षाच्या सुरुवातीलाच औरंगाबादच्या वाळुंज एमआयडीसी परिसरात तांबे आणि अ‍ॅल्युमिनियमचा ४ लाखांचा ऐवज लुटणा-या  चौघांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. मुंब्य्राजवळील दहिसर मोरी येथील ‘एमके ट्रेडर्स’ हे गोदाम लुटण्याच्या तयारीत असतानाच गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने त्यांच्यावर झडप घालून त्यांना अटक केली. रेहमान खान, प्रमोद स्वामी, रझाक शेख आणि संदीपकुमार शर्मा अशी या प्रकरणी अटक केलेल्या चौघा कथित दरोडेखोरांची नावे आहेत. चौघेही ३० ते ३५ वयोगटांतील असून, त्यातील स्वामी हा आंध्र प्रदेशचा तर उर्वरित तिघे हे उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. सध्या ते कल्याण परिसरात राहत होते. शीळ-डायघर भागातील ‘एमके ट्रेडर्स’ या गोदामावर दरोडा टाकण्यासाठी एक टोळी येणार असल्याची ‘टीप’ गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाचे पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे यांना मिळाली होती. त्यानुसार, ७ जानेवारीला पहाटे ४.३० वा.च्या सुमारास दहिसर मोरी भागातून सहायक पोलीस निरीक्षक सुनील वाघ, अशोक भंडारे, उपनिरीक्षक वसंत कांबळे, हवालदार शरद तावडे, शकील खान, गोविंद सावंत, दिनेश बनसोड आणि जयकर जाधव या पथकाने त्यांची धरपकड केली. त्यांच्याकडून कटावणी, सुरा, मिरचीची पूड आणि दोरखंडासह ४ लाखांचा ट्रकही हस्तगत केला आहे. दरोडेखोरांची ही टोळी मोठ्या विद्युत प्रोजेक्टसाठी लागणाऱ्या तांब्याच्या तारा आणि अ‍ॅल्युमिनियम चोरण्यात पटाईत आहे. पहाटेच्या सुमारास सुरक्षारक्षकाला बांधून माल लुटून न्यायचा, अशी या टोळक्याची दरोड्याची पद्धत होती.