शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद : पाच जेसीबींची खरेदी रखडली

By admin | Updated: July 20, 2016 19:20 IST

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यात जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने मार्च महिन्यात नऊ जेसीबी

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि.20 -  दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यात जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने मार्च महिन्यात नऊ जेसीबी खरेदीसाठी निधी उपलब्ध करुन दिला. त्यानंतर दीड महिन्यात यातील चार जेसीबींची खरेदी होऊन त्या कार्यान्वीत झाल्या. उर्वरित पाच जेसीबींच्या खरेदीची प्रक्रिया मात्र जलसंपदा खात्याच्या यांत्रिकी विभागाकडून अजूनही सुरूच आहे. आता पावसाळा सुरू झाल्यामुळे ही मशिनरी येऊनही जिल्ह्यात जलसंधारणाची कामे होऊ शकणार नाहीत. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून भिषण दुष्काळी परिस्थिती होती. त्यामुळे दुष्काळावर मात करण्यासाठी जिल्हाभरात जलयुक्त शिवार अभियान राबविले गेले. या अभियानात जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे करण्याच्या हेतूने जिल्हा नियोजन समितीने मार्च महिन्यात नऊ जेसीबी खरेदीचा निर्णय घेतला. त्यानुसार जलसंपदा खात्याच्या यांत्रिकी विभागाला आवश्यक निधीही उपलब्ध करुन दिला. पहिल्या टप्प्यात यांत्रिकी विभागाने एप्रिलअखेरीस चार जेसीबींची खरेदी केली. या जेसीबी लगेचच कार्यान्वीत झाल्या. परंतु उर्वरित पाच जेसीबींची खरेदी अजूनही झालेली नाही. आता उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाल्यामुळे जलयुक्तची कामे बंद झाली आहे. या पाच जेसीबींची मे महिन्यात खरेदी झाली असती तर त्याद्वारे जिल्ह्यात आणखी मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे होऊ शकली असती. मात्र यांत्रिकी विभागाच्या दिरंगाईमुळे जिल्ह्यास मोठा फटका बसला आहे. विशेष म्हणजे आता पावसाळा सुरू झाल्यामुळे आगामी काही महिन्यात जिल्ह्यात जलसंधारणाची कामे करता येऊ शकणार नाहीत. त्यामुळे यांत्रिकी विभागाने आता या मशिनरीची खरेदी केली तरी ती तशीच पडून राहणार आहे.

दोनदा निविदा काढल्यापाच जेसीबींची खरेदी बाकी आहे. त्यासाठी पुणे येथील कार्यालयाकडून प्रक्रिया राबविण्यात आली. दोन वेळा निविदाही काढण्यात आल्या होता. मात्र काही कारणांमुळे ती प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. आता तिसऱ्यांदा निविदा काढली आहे. लवकरच या पाच जेसीबींची खरेदी होईल. -एम. एम. काकड, कार्यकारी अभियंता, यांत्रिकी विभाग