शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद: बेपत्ता तीन मुलांचे मृतदेह पाझर तलावात आढळले

By admin | Updated: May 7, 2017 12:06 IST

जोगेश्वरी येथून शुक्रवारपासून घरातून गायब असलेल्या तीन शाळकरी मुलांचे प्रेत रांजगाण येथील पाझर तलावात आढळल्याने खळबळ उडाली आहे.

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद: जोगेश्वरी येथून शुक्रवारपासून घरातून गायब असलेल्या तीन शाळकरी मुलांचे प्रेत रांजगाण येथील पाझर तलावात
आढळल्याने खळबळ उडाली आहे.  पोहण्यासाठी पाण्यात उतरल्यानंतर पाण्यात बुडून त्यांचा अंत झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रेत बाहेर काढली. ही मुले पोहण्यासाठी पाण्यात उतरल्यानंतर बुडाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रेत बाहेर काढली. राहुल सुभाष साबळे(१४), दीपक संजय अहिरे(१३) आणि प्रकाश विजय राजपूत(१३,सर्व रा.जोगेश्वरी,वाळूज महानगर)अशी मृत मुलांची नावे आहेत. प्राप्त माहिती अशी की, शुक्रवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास खेळण्यासाठी घराबाहेर पडलेली ही तिन्ही बालमित्र नंतर घरी परतली नव्हती. परिणामी त्यांच्या पालकांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात राहुल, दीपक आणि प्रकाश यांचे अज्ञातांनी अपहरण केल्याची तक्रार नोंदविली होती. पोलिसांसह त्यांची पालक आणि नातेवाईक त्या बालकांचा युद्धपातळीवर शोध घेत असताना रविवारी सकाळी रांजणगाव शेणपुंजी येथील पाझर तलावात या मुलांचे प्रेत पाण्यावर तरंगताना आढळली. ही बाब परिसरातील नागरीकांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी अग्निशमन दलाासह चिमुकल्यांच्या नातेवाईकांना बोलावून घेतले. त्यानंतर तलावातून या चिमुकल्यांची प्रेत बाहेर काढण्यात आली. या मुलांचे प्रेत शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात हलविण्यात आली आहे. 
पोहोण्याचा मोह ?
शुक्रवारी दुपारी चार वाजता घराबाहेर पडल्यानंतर ही चिमुकले  फिरत फिरत रांजणगाव येथील तलावावर गेले असावे. तलावातील थंडगार पाणी पाहुन त्यांना पोहण्यासाठी उतरले असावे आणि पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांना जलसमाधी मिळाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलीस अधिका-यांनी व्यक्त केला.