कोल्हापूर : मराठवाडय़ातील दोन सहकारी साखर कारखाने व रायगड जिल्हय़ातील पेण अर्बन बँकेच्या मुंबईतील शाखेचा लिलाव करण्याचा निर्णय राज्य सहकारी बँकेने घेतला आहे. त्यासाठी बँकेने आज, मंगळवारीच निविदा मागविल्या असून, निविदा भरण्याची अंतिम मुदत 15 डिसेंबर्पयत आहे.
16 डिसेंबरला दुपारी राज्य बँकेच्या मुंबईतील मुख्यालयात सकाळी साडेअकरा वाजता या निविदा उघडण्यात येणार आहेत. बंद पडलेले सहकारी साखर कारखाने विक्री करण्याचा राज्य बँकेने जणू धडाकाच लावला आहे.
पेण अर्बन बँकेच्या मुंबईतील गिरगाव शाखेची थकबाकी 27 कोटी 33 लाख इतकी आहे. त्यांची गिरगाव शाखा फ्लॅट नंबर 2, दुसरा मजला, क्षेत्रफळ 355 चौरस फूट श्री लक्ष्मी सरस्वती कृपा, सिटी सव्र्हे क्रमांक 273, जगन्नाथ शंकरशेठ रोड, क्रांतीनगर रोड, गिरगाव, मुंबई या जागेची विक्री करणार आहे. त्याची राखीव किंमत 1 कोटी 2क् लाख रुपये आहे.
राज्य बँकेने ‘रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल असेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सरफेसी) अॅक्ट 2क्क्2’नुसार या निविदा मागवल्या आहेत. (प्रतिनिधी)
4औरंगाबाद जिल्हय़ातील वैजापूर येथील विनायक सहकारी साखर कारखाना 125क् टन गाळप क्षमतेचा आहे. त्यावर 31 मार्च 2क्14 अखेर 42 कोटी 48 लाख रुपयांचे कर्ज थकीत आहे.
4या कारखान्याची इमारत, यंत्रसामग्री व 84.18 हेक्टर जमीन विकण्यात येणार आहे. त्याची राखीव किंमत 31 कोटी 82 लाख रुपये आहे.
4लातूर जिल्हय़ातील निलंगा येथील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना 25क्क् टन गाळप क्षमतेचा आहे.
4या कारखान्यावर राज्य बँकेचे 141 कोटी 39 लाख, तर सहभाग योजनेतील 492 लाख कर्ज थकीत आहे. त्यासाठी कारखान्याची इमारत, यंत्रसामग्री व 92.85 हेक्टर जमीन विकण्यात येणार आहे. त्याची राखीव किंमत 62 कोटी रुपये इतकी आहे.