शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेत घुसण्याचा प्रयत्न

By admin | Updated: August 12, 2014 02:47 IST

मुंबईतील खड्डे आणि पालिका आस्थापनांतील गैरसोयींविरोधात आक्रोश व्यक्त करण्यासाठी सोमवारी मुंबई युवा काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मुंबई महानगरपालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला

मुंबई : मुंबईतील खड्डे आणि पालिका आस्थापनांतील गैरसोयींविरोधात आक्रोश व्यक्त करण्यासाठी सोमवारी मुंबई युवा काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मुंबई महानगरपालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला. या वेळी आंदोलकांना रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीचार्ज केला. त्यात काही कार्यकर्ते जखमी झाले.दरम्यान, मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांना शिवसेना व भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक जबाबदार असल्याचा आरोप करत युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबई मनपा मुख्यालयावर धडक मोर्चा काढला. या वेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी मुख्यालयात शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. त्यात पोलिसांसोबत झालेल्या वादावादीनंतर आंदोलकांना रोखणाऱ्या पोलिसांनी मोर्चावर लाठीचार्ज केला.याबाबत प्रतिक्रिया देताना मुंबई युवा काँग्रेसचे अध्यक्ष गणेश यादव म्हणाले, ‘शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी ठेकेदारांसोबत भ्रष्टाचार करून मुंबईला खड्ड्यात घातले आहे. ठेकेदारांशी संगनमत करून नगरसेवकांनी रस्त्यांच्या कंत्राटात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. त्याचा त्रास सर्वसामान्यांना भोगावा लागत आहे. याचाच जाब विचारण्यासाठी युवा काँग्रेसने आज महापालिका आयुक्तांची भेट घेण्यासाठी शांततेच्या मार्गाने मोर्चा काढला होता. मात्र पोलिसांना हाताशी घेऊन महापालिका प्रशासनाने आंदोलकांवर लाठीचार्ज केला.’ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘महापालिका मुख्यालयाबाहेर रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत थेट मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांनाही आंदोलकांनी धक्काबुक्की केली. तरीही शांततेचे आवाहन करणाऱ्या पोलिसांवर काही आंदोलकांनी हातात असलेल्या झेंड्याच्या काठ्या भिरकावल्या. परिणामी, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज करावा लागला.’ (प्रतिनिधी)