लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पोटच्या अल्पवयीन मुलीवर वर्षभर बापानेच बलात्कार केल्याची घटना धायरीतील रायकर मळा येथे उघडकीस आली असून, सिहंगड पोलिसांनी नराधम बापास अटक केली आहे. पीडित मुलीनेच सिहंगड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा प्रकार समोर आला. पीडित मुलगी पंधरा वर्षांची आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपीचा (वय ३६) रिक्षा चालविण्याचा व्यवसाय आहे. त्याच्या त्रासाला कंटाळून पत्नी सोडून गेली होती. शिक्षणानिमीत्त वडिलांकडेच राहिलेल्या पीडित मुलीवर फेब्रवारी २०१६ पासून तो वेळोवेळी बलात्कार करीत होता.
मुलीवर अत्याचार करणारा अटकेत
By admin | Updated: May 12, 2017 02:57 IST