शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

महिलेच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

By admin | Updated: November 29, 2015 02:36 IST

महिलेचे अपहरण करण्याचा प्रयत्न तिच्या मुलाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे रेहकुरी येथे फसला. पोलिसांनी तिघांना गजाआड केले असून एक आरोपी पळून गेला.

कर्जत (अहमदनगर) : महिलेचे अपहरण करण्याचा प्रयत्न तिच्या मुलाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे रेहकुरी येथे फसला. पोलिसांनी तिघांना गजाआड केले असून एक आरोपी पळून गेला. पोलीस सूत्रांची माहिती अशी की, कर्जत तालुक्यातील रेहकुरी येथे बाळू दौलत मांडगे यांचे कुटुंब राहते. त्यांच्या घरातील सर्व सदस्य उंच आहेत. पैशांचा पाऊस पाडण्यासाठीआलेल्या आरोपींना उंच महिला हवी होती. शुक्रवारी सायंकाळी फिर्यादी बाळू मांडगे, त्यांची पत्नी घरीच होती. तेव्हा सहा वाजेच्या सुमारास अंकुश काळे व देविदास कर्पे हे आणखी दोन व्यक्तींसमवेत त्यांच्या घरी आले. ते म्हणाले, तुमची पत्नी उंच आहे. त्यांची उंची मोजल्यावर तुम्हाला भरपूर पैसे मिळतील, असे सांगत आरोपी मांडगे यांच्या पत्नीची उंची मोजण्यास पुढे आले असता, मांडगे पती-पत्नीने त्यांना विरोध केला व घराबाहेर काढले. मात्र त्यातील दोघांनी लाथ मारून घालून दरवाजा उघडला, यानंतर आणखी दोन आरोपी आले. त्यांनी उंची मोजण्यास सुरुवात केली. तेवढ्यात या महिलेचा मुलगा अमोल मांडगे हा घरी आला. काय चाललेय, हे त्याला काही वेळ समजलेच नाही. त्याने शिताफीने दरवाजा लावला. मात्र यावेळी चार आरोपींपैकी एक देविदास कर्पे पळून जाण्यात यशस्वी झाला. अमोल मांडगे यांनी तीन आरोपींना घरात कोंडले व पोलिसांना कळविले. पोलीस आले, तीन आरोपींना पकडून घेऊन गेले. या आरोपींमध्ये गावातील एकाचा समावेश आहे. अंकुश काळे, देविदास कर्पे, सुरेश कुळधरणे, सुभाष बाबासाहेब धुमाळ यांच्याविरोधात कर्जत पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.