शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

बनावट नोटा पुरविणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2017 03:54 IST

बनावट नोटा चलनात आणणाऱ्या रॅकेटच्या एका सदस्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी रात्री अटक केल्यानंतर त्याला नोटा

औरंगाबाद : बनावट नोटा चलनात आणणाऱ्या रॅकेटच्या एका सदस्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी रात्री अटक केल्यानंतर त्याला नोटा पुरविणाऱ्या फेरोज अब्दुल रशीद देशमुख (२७, रा. नारेगाव, मूळ रा. अंबड, जि. जालना) याच्याही सोमवारी पहाटे मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. सेंट्रल जकात नाका येथे एका हॉटेलमध्ये चहा पीत असताना दोन्ही आरोपींमध्ये या व्यवहाराची डील झाल्याचे समोर आले. फेरोजकडून दोन हजारांच्या २ बनावट नोटा पोलिसांनी हस्तगत केल्या. महंमद इर्शाद महमंद इसाक (२७, रा. शहाबाजार) यास रविवारी रात्री १८ बनावट नोटांसह पकडण्यात आले होते. इर्शद घाटी रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी असून तो आॅपरेशन थिएटरमध्ये काम करायचा. इर्शादच्या म्हणण्यानुसार फेरोज त्याला नोटा पुरवीत असे. ३० हजार रुपयांच्या बदल्यात तो एक लाखांच्या बनावट नोटा देत असे. इर्शादने आतापर्यंत दीड लाख रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. त्याचे आणखी काही साथीदार असावेत, असा पोलिसांना संशय आहे. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने फेरोजला सोमवारी पहाटे नारेगाव येथील त्याच्या घरातून अटक करण्यात आल्याचे उपनिरीक्षक जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)