शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘अ‍ॅट्रॉसिटी कायदा’ रद्द होणार नाही

By admin | Updated: October 12, 2016 06:44 IST

राज्यात मराठा समाजाचे मूक मोर्चे मोठ्या प्रमाणात निघाले. यामुळे दलित समाजात थोडी अस्वस्थता दिसून आली. परंतु दलित समाजाला अस्वस्थ होण्याची गरज नाही. कारण

नागपूर : राज्यात मराठा समाजाचे मूक मोर्चे मोठ्या प्रमाणात निघाले. यामुळे दलित समाजात थोडी अस्वस्थता दिसून आली. परंतु दलित समाजाला अस्वस्थ होण्याची गरज नाही. कारण अ‍ॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करता येत नाही आणि यासंदर्भात सरकारचा तसा कुठलाही मानस नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथे केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीतर्फे ६०वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा मंगळवारी रात्री येथील दीक्षाभूमीवर पार पडला. त्याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जून सुरेई ससाई होते. प्रमुख पाहुणे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, बिहारचे राज्यपाल रामनाथ कोवींद, केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले, राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री (पान ६ वर)चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, आंध्र प्रदेशचे माजी मंत्री श्रीधर बाबू, महापौर प्रवीण दटके, कमलताई गवई, आमदार डॉ. मिलिंद माने, प्रकाश गजभिये, विभागीय आयुक्त अनुपकूमार, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले आदी उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात भदंत आर्य नागार्जून सुरेई ससाई यांनी उपस्थितांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देत तथागत गौतम बुद्धांच्या मार्गावर चालण्याचे आवाहन केले. दीक्षाभूमीवर येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे दीक्षाभूमी लगतची कॉटन रिसर्च सेंटरची ३.५ एकरची जागा व माताकचेरीला लागून असलेली राज्य शासनाची नऊ एकरची जागा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने मदत करण्याचे आवाहन सदानंद फुलझेले यांनी प्रास्ताविकातून केली. यावेळी त्यांनी ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट दीक्षाभूमी डॉट ओआरजी’ हे संकेतस्थळ सुरू झाल्याची घोषणाही केली. (प्रतिनिधी)