शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

शाळांत आता अत्याचार निवारण कक्षाची सक्ती

By admin | Updated: January 17, 2015 05:50 IST

दिल्लीतील निर्भया आणि मुंबईतील शक्ती मिल प्रकरणानंतर महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने विविध

ठाणे : दिल्लीतील निर्भया आणि मुंबईतील शक्ती मिल प्रकरणानंतर महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने विविध योजना हाती घेतल्या असून न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी समितीच्या अंतरीम अहवालाच्या शिफारशींनुसार आता महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांसह अध्यापक विद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये महिला अत्याचार निवारण कक्ष स्थापन करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने एका परिपत्रकाद्वारे काढले आहेत़या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रत्येक जिल्ह्याच्या प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत़ यासाठी संबंधितांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या आणि व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या व्यवस्थापनांकडे पाठपुरावा करून या आदेशाच्या अंमलबजावणीचा अहवाल विभागीय संचालकांसह शासनास सादर करावा, असे बजाविण्यात आले आहे़महिलांवरील अत्याचार रोखून दोषींवर कारवाई होण्याकरिता न्यायमूर्ती धर्माधिकारी समितीने आपल्या अंतरीम अहवालात अनेक शिफारशी महाराष्ट्र शासनास केल्या आहेत़ यात न्यायालयापासून औद्योगिक आस्थापना आणि ग्रामपातळीपर्यंतच्या संस्थांत महिला अत्याचार निवारण समिती स्थापन करण्याच्या कार्यवाहीचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत़ आता याच समितीच्या शिफारशींनुसार शालेय शिक्षण विभागाच्या अवर सचिव स्वाती नानल यांनी एका परिपत्रकाद्वारे प्रत्येक शाळेत महिला अत्याचार निवारण कक्ष स्थापण्याचे जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना बजाविले आहे़दिल्लीतील निर्भया आणि मुंबईतील शक्ती मिल प्रकरणांनंतर महिला अत्याचारांच्या घटनांतील पीडितांच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी राज्य शासनाने यापूर्वी मनोधैर्य ही योजना सुरू केली आहे़ तसेच गृह विभागाने विविध पोलीस ठाण्यांत महिला अत्याचार निवारण कक्ष स्थापन करून त्याचे कामकाज महिला दक्षता समित्यांच्या माध्यमातून करण्याचे बजावले आहे़ यात पीडित महिलांची चौकशी पुरुष अधिकाऱ्याने न करता महिला कर्मचारी-अधिकाऱ्याने संबंधित दक्षता समितीच्या प्रतिनिधींच्या साक्षीने करण्याचे बंधन घातले आहे़ (खास प्रतिनिधी)