शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारसभांनंतर ‘वातावरण’ही तापले

By admin | Updated: February 15, 2017 03:55 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मंगळवारच्या विक्रोळी येथे झालेल्या जाहीर सभेनंतर महापालिका निवडणुकीचे वातावरणही तापले

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मंगळवारच्या विक्रोळी येथे झालेल्या जाहीर सभेनंतर महापालिका निवडणुकीचे वातावरणही तापले आहे. त्यात हवामानात झालेल्या बदलामुळे मुंबईचे कमाल आणि किमान तापमान वरचढ नोंदवण्यात येत असून, बदलत्या वातावरणामुळे मुंबईकरांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. मंगळवारचे मुंबईतील कमाल तापमान ३६.७ नोंदविण्यात आले आहे. एकंदर इथल्या प्रचार सभांसह हवामानातील बदलामुळे वातावरण आणखी नरम-गरम होणार आहे. मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३.७, २२.५ अंश नोंदवण्यात येत असून, बुधवारसह गुरुवारी कमाल तापमान ३५ अंशांच्या आसपास नोंदवण्यात येईल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. जानेवारी महिना थंडीसह काहीसा उकाड्याचा गेला असतानाच फेब्रुवारीचा पहिला आठवडा काहीस गार गेला आहे. मात्र मागील तीन दिवसांपासून पुन्हा कमाल तापमानात वाढ नोंदवण्यात येत आहे. विशेषत: सूर्याची प्रखर किरणे तापदायक ठरत असून, प्रखर सूर्यकिरणांचा मारा मुंबईकरांना सहन करावा लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे दिवसा तापदायक ऊन पडत असतानाच रात्री किंचितसा गारवा जाणवत आहे. परिणामी दुहेरी वातावरणाचा मुंबईकरांना सामना करावा लागत आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, राज्याच्या संपूर्ण भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)