नागपूर : ग्रहताऱ्यांच्या दशा, फेरे या बाबी भारतीय प्राचीन ग्रंथांत कुठेच आढळत नाहीत. फलज्योतिष ही आयात केलेली अंधश्रद्धा आहे, असे परखड मत नामवंत वैज्ञानिक डॉ.जयंत नारळीकर यांनी मंगळवारी व्यक्त केले. शिवाजी विज्ञान महाविद्यालयातर्फे आयोजित ‘इन्स्पायर’ या विज्ञान शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी ते नागपुरात आले होते. या वेळी डॉ़ नारळीकर यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.आपल्या देशात फलज्योतिषावर मोठ्यांपासून ते अगदी सामान्य व्यक्तींचा प्रगाढ विश्वास असल्याचे दिसून येते. परंतु खरोखर शास्त्रीय कारणातून हे शास्त्र विकसित झाले आहे का, याचे दाखले तपासण्याची आवश्यकता आहे. वेदांमध्ये तसेच प्राचीन ग्रंथांतून फलज्योतिष मिळालेले नाही तर ते ग्रीक संस्कृतीतून आपल्याकडे आले. तार्किक व शास्त्रीय दृष्टीने त्यातील विज्ञान तपासण्याऐवजी अंधश्रद्धेच्या रूपातच याचा जास्त प्रसार झाला, असे डॉ. नारळीकर म्हणाले. (प्रतिनिधी)
फलज्योतिष ही ग्रीकांकडून आयात केलेली अंधश्रद्धा
By admin | Updated: January 14, 2015 04:00 IST