शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता दोन हजार कोटींची दाखविली केवळ ३३९ कोटी

By admin | Updated: August 13, 2014 00:43 IST

सहकार विभागाच्या दप्तरी राज्यातील भूविकास बँकेची मालमत्ता केवळ ४३९ कोटी ८९ लाख दर्शविण्यात आली आहे. प्रत्यक्षात ही मालमत्ता दोन हजार कोटींच्या घरात असल्याची माहिती आहे.

खरा अहवाल दडपल्याचा आरोप : भूविकास बँकेचे शिलकीचे अंदाजपत्रकही तोट्यात रूपेश उत्तरवार - यवतमाळ सहकार विभागाच्या दप्तरी राज्यातील भूविकास बँकेची मालमत्ता केवळ ४३९ कोटी ८९ लाख दर्शविण्यात आली आहे. प्रत्यक्षात ही मालमत्ता दोन हजार कोटींच्या घरात असल्याची माहिती आहे. सहकार विभागाने अहवालात वास्तविकता दडपली असून शिलकीचे अंदाजपत्रकही तोट्यात दाखविले आहे.राज्य शासनाने भूविकास बँकेचे कर्ज वाटप करण्यासाठी अनेक कमिट्या नियुक्ती केल्या. या कमिट्यांच्या अहवालावरून बँक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या चुकीच्या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांनी सहकार मंत्र्यांना पत्र लिहिले. त्यात बँकेच्या इमारती वर्दळीच्या ठिकाणी आहेत. पुण्याची इमारत मोक्क्याच्या जागेवर आहे. त्याची किंमत ४०० कोटींच्या घरात आहे. यासोबत राज्यात इतर ठिकाणी बँकेच्या इमारतींची किंमत १६०० कोटींच्या घरात आहे. असे असतानाही बँकेने आपल्या अहवालात मालमत्ता ४३९ कोटी ८९ लाख रुपये असल्याचे दर्शविले आहे. प्रत्यक्ष बाजारदर आणि अहवालातील किंमतीत मोठी तफावत आहे. सभासदांकडून येणारी थकबाकी ५८१ कोटी आहे तर शासनाच्या व्याजमाफीतून ५०० कोटी रुपये मिळणार आहे. मात्र शासनाने चुकीची आकडेवारी सादर करून बँकेचे अस्तित्व धोक्यात आणले आहे. बँकेकडे ६२९ कोटी शिल्लक राहतात. यावर नाबार्ड हमी घेऊन कर्ज वितरणासाठी पैसे देऊ शकते, त्यामुळे बँक बंद करण्याचा निर्णय घेऊ नये असे पत्र शेतकऱ्यांनी सहकार मंत्र्यांना पाठविले आहे. या पत्रावर आर.पी. सांभारे, रामराव राऊत, आनंदराव सुभेदार, विनोद घुईखेडकर, सुधाकर राऊत, पुंडलिक बोक्से, डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.